01:43pm | Nov 27, 2020 |
सिडनी: यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची अक्षरक्ष: धुलाई केली. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय संघाची गोलंदाजी फोडून काढत 6 बाद 375 धावांचे खडतर आव्हान भारतासमोर उभे केले. एवढा मोठा धावांचा डोंगर उभा करताना ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले.
डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांवर वचर्स्व ठेवले. दोघांनी पहिल्या विकटेसाठी 156 धावांची भागिदारी केली. मोहम्मद शमीने वॉर्नरची विकेट घेतली. वॉर्नरने 76 चेंडूत 69 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथने टी-20 स्टाईलने फलंदाजी सुरू केली. त्याने फक्त 36 चेंडूत 50 धावा केल्या. दुसर्या बाजूला कर्णधार फिंचने भारताविरुद्धचे चौथे शतक 117 चेंडूत पूर्ण केले.
शतक झाल्यानंतर तो 114 धावांवर बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. त्यानंतर युजवेंद्र चहलने मार्कस स्टायोनिसला पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद करून माघारी पाठवले. स्टायोनिसच्या जागेवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्याने 19 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा केल्या. त्यानंतर नवदीप सैनीने मार्नस लाबुशानेला 3 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलिची पाचवी विकेट घेतली.
मधळ्या फळीतील दोन फलंदाज झटपट बाद झाले तरी स्टीव्ह स्मिथने एकाबाजूने धावांचा वेग सुरू ठेवला होता. त्याने फक्त 62 चेंडूत शतक केले. अखेरच्या षटकात मोहम्मद शमीने त्याची बोल्ड घेतली. स्मिथने 63 चेंडूत 101 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक दोन, तर बुमराह, सैनी, चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |