12:35pm | Sep 21, 2020 |
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्राला पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर मध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी तर जो बायडन यांना आघाडी मिळत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात जो बायडन यांना सर्वाधिक मतदारांची पसंती असल्याचे समोर आले आहे.
एबीसी न्यूज-वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात बायडन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. बायडन यांना 57 टक्के आणि ट्रम्प यांना 41 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. मिनेसोटामध्ये ही बायडन यांना आघाडी आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मिनेसोटामध्ये आघाडी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रचारासाठी मोठा निधीही गुंतवला आहे. ट्रम्प यांना या ठिकाणाहून 1.5 गुणांनी पराभव स्विकारावा लागला होता.
जॉर्जिया, आयव्होवा, ओहायो आणि टेक्साससारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार होणार आहे. या ठिकाणीदेखील बायडन यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणीही बायडन विजयी झाल्यास 340 इलेक्टोरल व्होट होतील. या चारही राज्यात बायडन विजयी झाल्यास इलेक्टोरल व्होटची संख्या 400 हून अधिक होऊ शकते. बायडन यांच्याकडे 340 इलेक्टोरल व्होट जिंकण्याची शक्यता 45 टक्के आहे. तर, ट्रम्प विजयी होण्याची शक्यता 25 टक्के इतकी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील प्रचारासाठी जोर लावला आहे. ट्रम्प यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरीक मतदारांसह इतरही मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वर्णद्वेषी आंदोलकांवरही त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. बायडन सत्तेवर आल्यास चीन अमेरिकेवर वर्चस्व गाजवेल असा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. जवळपास 20 लाख अमेरिकन-भारतीय मतदान करणार आहेत. त्यांनाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी सुरू केला आहे. अमेरिकन-भारतीय मतदारांमध्ये ट्रम्प यांना पसंती दिली जात असली तर बायडन आघाडीवर आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |