सातारा : मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले.
मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणार्या यमुनाबाई वाईकर या बर्याच दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर वाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यमुनाबाई यांचा जन्म 31 डिसेंबर 1915 रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी स्वत:चा तमाशा फड काढला होता. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर आख्खा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या. ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्यांची दखल घेवून महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी ऍवार्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणार्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सुमारे बावीस राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. मराठी तमाशा क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे. अशा या सातारच्या भूमितील थोर लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कृष्णाकाठच्या या कलासाधिकेने आपले संपूर्ण आयुष्यच कलेसाठी अर्पण केले होते. आयुष्यात आलेल्या अनेक खडतर मार्गांना, प्रसंगांना अतिशय समर्थतेने तोंड देत त्यांनी आपल्या कलेची जोपासना केली. अखेर ज्या कृष्णाकाठी त्यांचा जन्म झाला, त्याच कृष्णाकाठी आज त्या विसावल्या.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |