03:31pm | Apr 13, 2019 |
सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडून राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ सभासद शेतकर्यांना होत आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान नेहमी उंचावत ठेवण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असून शेतकर्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जात आहेत. संचालक मंडळाच्या दूरदृष्टीमुळे आणि सभासद शेतकर्यांच्या सहकार्यामुळे अजिंक्यतारा कारखाना प्रगतीपथावर आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज उल्लेखनीय व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कारखान्याच्या 2018-19 या 35 व्या गळीत हंगामाचा सांगता समारभ कारखाना कार्यस्थळावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालक विनायक भरत बर्गे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता विनायक बर्गे या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण पुजा आणि हंगामातील शेवटच्या 5 साखर पोत्यांचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
कारखान्याचे संचालक मंडळाने नेहमी कारखान्याचा विकास साध्य करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन सभासदांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सातत्याने सभासदाभिमुख कारभार करून अत्यंत काटकसरीचे धोरण अवलंबविले. त्यामुळे कारखान्याकडील साखर उत्पादनाबरोबर डिस्टीलरी, इथेनॉल व को.जनरेशन हे मूल्यवर्धीत प्रकल्प यशस्वीपणे राबविले जात आहेत. कारखान्याचा सन 2018-19 चा गळीत हंगाम उत्कृष्टरित्या व यशस्वीपणे पार पडला असून या 35 व्या गळीत हंगामात कोणत्याही प्रकारचे मेजर मशिनरी प्रॉब्लेम उदभवलेले नाहीत. कारखाना सुरळीतपणे चालला. भागातील ऊसाची उपलब्धता होण्यासाठी सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, कार्यकर्ते व कर्मचारी बंधूंचे ङ्गार मोठे योगदान आहे. या गळीत हंगामात 163 दिवसांत एकूण 6,36,340 मे.टन ऊसाचे गाळप करून सरासरी 12.33% या साखर उतार्याने 7,85,400 क्विंटल साखर उत्पादन केली. यामध्ये 1,62,300 क्विंटल रॉ शुगरचा समावेश आहे. सदर हंगामात सरासरी 156.68% क्षमतेचा वापर होऊन प्रतिदिन 4008.44 मे.टन सरासरीने ऊस गाळप केले. सरासरी हेक्टरी टनेजसुध्दा 80.00 मे.टन निघालेले आहे.
2018-19 चे गाळप हंगामात शासन निर्धारीत सूत्रानुसार कारखान्याची एङ्ग.आर.पी. प्रति मे.टन रूपये 2815/- असून या हंगामात सुरूवातीपासून गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून प्रति मे.टन 2300/- ऊसाचे पेमेंट (विनाकपात) केलेले आहे व उर्वरित प्रति मे.टन रूपये 515/- देय असून या पेमेंटची लवकरच व्यवस्था करण्यात येत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. या हंगामात कारखान्याकडील डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प यशस्वीपणे चालला असून को.जनरेशनकडे 5 कोटी 88 लक्ष 30 हजार युनिटस घथक विजेचे उत्पादन करून यामधून 1 कोटी 52 लक्ष 57 हजार वीज युनिटस घथक अंतर्गत वापर करून 3 कोटी 72 लक्ष 6 हजार युनिटस घथक वीज वितरण कंपनीस निर्यार्त करण्यात आली आहे. को.जनरेशन क्षमता वापर 87.85% इतका झालेला आहे.
गाळप हंगामात कारखान्याचे सभासद, बिगर सभासद शेतकर्यांनी ऊस पुरवून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यास केलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले. तसेच अधिकारी, कर्मचारी-कामगार व ऊस वाहतूक कंत्राटदार आणि तोडणी मजूर यांचेही आभार मानले. पुढील सन 2019-20 च्या गळीत हंगामामध्ये काही प्रमाणात ऊसाची टंचाई भासणार आहे. असे असले तरी पुढील हंगामाकरिता गाळपाचे योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. मात्र, पुढील हंगाम हा आव्हानात्मक असला तरी कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मनोदय असून त्यासाठी कारखान्याचे सभासद, बिगर सभासद शेतकर्यांनी आपला हक्काचा ऊस आपल्याच हक्काच्या अजिंक्यतारा कारखान्यास गळीतास पुरवून बहुमोल सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.
कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक संजीव देसाई आणि संचालक नामदेव विष्णू सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, राजाराम जाधव तसेच संचालक मडळाचे सर्व संचालक सदस्य आणि कारखान्याचे सभासद, बिगर सभासद शेतकरी, अधिकारी, कामगार-कर्मचारी, कार्यकर्ते व अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर सांगता समारंभप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास शेडगे, माजी संचालक लालासाहेब पवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी जि.प.सदस्य राजू भोसले, पंचायत समिती उप.सभापती जितेंद्र सावंत, पं.स.सदस्या सौ. छाया कुंभार, माजी सदस्य विलास कदम, सुतगिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, माजी अध्यक्ष पंडीतराव सांवत, तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष गणपतराव शिंदे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, माजी अध्यक्ष मधुकर यादव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार, मार्केट कमिटी सदस्य श्रीरंग देवरूखे, अजिंक्य उद्योग समुहाचे आजी माजी सदस्य, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, युनियन अध्यक्ष धनवे, अधिकारी, कर्मचारी-कामगार इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |