03:09pm | Jun 27, 2019 |
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात एटीएम कार्डद्वारे फसवणूक होणार्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच तीन घटनांमधून 2 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मोबाईलवरील एनी डेस्क, टीम व्हीव्हर असे ऍप टाळण्याचे सातारा सायबर पोलिसांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
मुगुटराव रामदास देशमुख (वय 36, रा.अंबवडे, सातारा), राहूल महादेव पवार (रा,वडूज), ज्ञानेश्वर आनंदराव गायकवाड (रा.विसावा नाका) या तिघांच्या बँकेच्या खात्यातून 2 लाख 89 हजार रुपये अज्ञाताने काढून फसवणूक केलेली आहे. यासंबंधी सातारा सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाण्याच्यावतीने सातारकरांना आवाहन करण्यात आले आहे.
अज्ञातांकडून फोन करुन गुगल प्ले स्टोअरमधून एनी डेस्क नावाचे ऍप डाउनलोड करुन घेण्यास सांगितले जाते. ते ऍप डाउनलोड केल्यानंतर 9 अंकी क्रमांक येतो. फोन करणार्या अज्ञात व्यक्ती तो क्रमांक विचारतात. संबंधित क्रमांक सांगितल्यानंतर बँक खात्यातील रक्कम चोरी होते. यामुळे अज्ञाताने किंवा बँकेच्या नावाने जरी फोन आला तर असे कोणत्याही प्रकारचे ऍप डाउनलोड करु नयेत. मोबाईल ऍपवरील येणारा कोणताही क्रमांक अज्ञाताला सांगू नये. मोबाईल ऍपवरील नवीन ऍपाबाबत माहिती असल्यासच ते वापरावे, अन्यथा वापरु नये. इंटरनेटवर बनावट साईट मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे इंटरनेट बँकींग करणार्यांची त्यातून फसगत होत आहे. यामुळे सावधानता बाळगावी, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारखे वॉलेट वापरत असताना यूपीआय आयडी, पिन नंबर कोणाशीही शेअर करु नये. मोबाईलवर कोणतेही ऍप्लीकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याखालील माहिती संपूर्ण वाचावी. खात्री झाल्यानंतरच ऍप इन्स्टॉल करावेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून मॉल, पेट्रोलपंप याठिकाणी पैसे जमा करत असताना स्वॅपिंग मशीनला स्कॅमर बसवलेला नाही ना, याची खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |