01:45am | Jan 12, 2019 |
सातारा : मद्यप्राशन करुन रस्त्यालगत उभारलेल्या वृध्दांना चारचाकी कारने उडवून त्यातील एका वृध्दाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भूषण अतुल कदम (वय 24, रा. खेड, नांदगिरी ता.कोरेगाव) याला जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्षा पारगावकर यांनी 3 वर्षे सक्तमजुरी व 7500 रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, सव्वावर्षापूर्वी झालेल्या या अपघातात आरोपी याने तिघांना उडवल्यानंतर दोन वाहनांनाही ठोकर दिली होती.
हरिश्चंद्र भिवाजी काशीद (वय 60, रा.खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. तर सुरेश दशरथ घनवट (वय 42, रा.नांदगिरी), अकोबा बाब सूळ (वय 65, रा.नांदगिरी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी हरिश्चंद्र काशीद, सुरेश घनवट, आकोबा सूळ हे तिघे गावातील रस्त्यालगत बोलत उभे थांबले होते. त्यावेळी भूषण कदम हा त्याच्या ताब्यात असणारी एमएच 11 बी.क्यू. 9083 ही कार घेवून सातारारोडहून खेडकडे निघाला होता. खेडजवळ येताच त्याने संबंधित तिघांना ठोकरले व एका कारसह दुचाकीलाही धडक दिली. या अपघाताने परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी चालकाला पाहिल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले असल्याचे समोर आले. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. दुर्देवाने मात्र यातील हरिश्चंद्र काशीद यांचा मृत्यू झाला.
कोरेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पोलिस हवालदार सत्यवान मधुकर बसवंत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास फौजदार बी.एस.सांगळे यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार व बचाव पक्षाचा जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी भूषण कदम याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ऍड. उर्मिला फडतरे व ऍड. आशिर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे फौजदार पी.के.कबुले, पोलिस हवालदार अजित शिंदे, कांचन बेंद्रे, एस.एस.सावंत, दळवी यांनी सहकार्य केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |