सातारा : सातारा पोलिसांच्या कोंम्बिग ऑपरेशनमध्ये प्रतापसिंहनगर येथे दारुविक्री प्रकरणी लक्ष्मी रामचंद्र जाधव (वय 65, रा.प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा) या महिलेला अटक केली. तिच्या घरालगत पत्र्याच्या शेडमधून देशी दारुचा बॉक्स जप्त केला आहे. दरम्यान, संशयित लक्ष्मी जाधव ही मोक्कामध्ये अटकेत असलेल्या गुंड दत्ता जाधव याची आई आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी सातारा पोलिसांनी शहरासह परिसरात ठिकठिकाणी कोंम्बिग ऑपरेशन राबवले. पोलिसांचे एक पथक सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंहनगरमध्येही गेले होते. पोलिस झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास दत्ता जाधव याच्या घरालगत पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली असल्याचे निदर्शनास आले.
पोलिस पत्र्याच्या शेडमध्ये गेल्यानंतर त्याठिकाणी दत्ता जाधव याची आई लक्ष्मी जाधव होती. पोलिसांनी पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता त्याठिकाणी देशी दारुचे बॉक्स आढळले. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्या दारुच्या बाटल्या विक्रीसाठी आणल्या असल्याची कबुली लक्ष्मी जाधव यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता बॉक्समध्ये 2496 रुपये किंमतीच्या 48 देशी दारुच्या बाटल्या होत्या. पोलिसांनी सर्व दारु जप्त केली. यावेळी पोलिसांनी लक्ष्मी जाधव हिला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. बेकायदा दारुविक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करुन लक्ष्मी जाधव हिला अटक करण्यात आली. दरम्यान, तेजा तुपे या पोलिसाने पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख तसेच सातारा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत शहर, शाहूपुरी, तालुका व बोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |