वाई : पीडित मुलीला जबरदस्तीने उचलून नेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग करणाऱ्या व कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी करणाऱ्या देविदास निवृत्ती शेळके (वय४८) रा. पसरणी (ता.वाई) यास न्यायाधीश व्ही. एच. चव्हाण यांनी सहा महिने कैद व पीडित मुलीस नुकसान भरपाई अशी शिक्षा ठोठावली.
१७ एप्रिल २०१२ रोजी आरोपी देविदास शेळके याने पीडित मुलीशी वाईट हेतूने उचलून घेऊन गेला. व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला यावेळी पीडित मुलीने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरड केली असता आरोपी शेळके याने तिला शिवीगाळ व दमदाटी करत कुऱ्हाडीने डाव्या मांडीवर व दोन्ही हातावर मारहाण करून जखमी केले होते. याबाबतची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. तपास अधिकारी पोलीस हवालदार ए. आर. हेंद्रे यांनी या घटनेचा तपास करून दि. २५ जून २०१२ रोजी शेळके याच्या विरोधात वाई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीत सरकारी वकील भीमराव देशमुख यांनी सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ऐकून सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी देविदास शेळके याला सहा महिने कैद व पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून अडीच हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश सूनवला तसेच दंड न भरल्यास आरोपीला आठ दिवसाची कैद सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील भीमराव देशमुख यांनी काम पाहिले, त्यांना पोलीस हवालदार हिरा धुळे यांनी सहकार्य केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |