सातारा : माजी जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील गुुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात मोक्का, तडीपार सारख्या कारवाई करून गुन्हेगारीला आळा घातला. माझा सुध्दा हाच मानस आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर जरब बसविण्यासाठी कारवाईचा धडाका यापुढे चालूच ठेवला जाणार आहे, अशी ग्वाही नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परीषदेत जिल्हा वासियांना दिली. दरम्यान जिल्ह्यासह सातारा शहरात निर्माण होणारा राजकीय प्रश्न हा परिस्थितीनुसार हाताळला जाईल असे त्यांनी सांगीतले.
सातारा जिल्हा पोलीस दलाचा पद्भार मी आजच हाती घेतला आहे. मागील पार्श्वभुमिविषयी थोडक्यात सांगताना एसपी पंकज देशमुख म्हणाले, माझे शिक्षण बीईमधून झाले आहे. पोलीस दलात येण्यापुर्वी मी एका खाजगी कंपनीत दोन वर्षे काम केले आहे. त्यानंतर 2011 साली पोलीस दलाच्या सेवेत आलो. हैद्राबाद टे्रनिंगनंतर एक वर्षे अमरावतीमध्ये काम केले. त्यांनतर माझे पहिले पोस्टींग उस्मानाबादला झाले होते. त्याठिकाणी काम करताना दरोड्याच्या गुन्ह्यात एका फौजदार व तीन पोलीस कर्मचार्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना एक वर्षभर कारागृहात काढावे लागले. त्यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माझी मोठी कारवाई होती. असे सांगून देशमुख म्हणाले, गुन्हेगारीमध्ये पोलीस दलातील कर्मचार्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी पोलीस अधिक्षक संदिप पाटील हे कारवाईत असल्याने त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. त्यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी, राजकीय पस्थितीची माहिती घेणार आहे. गुन्हेगारांना विषयी दयामाया दाखवली जाणार नाही. तडीपारी, मोक्का अशा चालू असलेल्या कारवायाचा धडाका पुढे आपण चालूच ठेवणार आहे. तसेच पोलीस खात्याअंतर्गत गुन्हेगारीला कोण मदत करत असतील अशा कर्मचार्यांवर आपली करडी नजर रहाणार आहे. गुन्हेगारावर शेवटपर्यंत कारवाई होईल यासाठी आपले प्रयत्न रहाणार आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी डोक वर काढणार नाही याची खबरदारी निश्चितपणे घेतली जाईल. तसेच सातारा शहरातील जटील बनलेला वाहतुकीचा प्रश्न, सातारा बसस्थानकाच्या आवारात होणारी वाहतुकीची कोंडी, रात्रीच्यावेळी ग्राहकांवर रिक्षा चालकांकडून होणारी दादागिरी यावर माहिती घेवून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्हावासियांना देतो असे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान उस्मानाबाद मध्ये काम करताना तेथील राजकीय परिस्थिती ही वेगळी होती. सातार्यातील राजकीय परिस्थितीची अपणाला माहिती असेलच या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एसपी देशमुख म्हणाले, मी नुकताच पदभार हाती घेतला आहे. संदिप पाटील यांच्याशी आपला अद्यापही संकर्प झालेला नाही. माहीती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यासह सातारा शहरात निर्माण होणारा राजकीय प्रश्न हा परिस्थितीनुसार हाताळला जाईल असे त्यांनी सांगीतले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |