सातारा : म. फुले यांचे खटाव तालुक्यातील कटगुण येथील घराची दुरावस्था अत्यंत शोचनीय व बघवत नाही अशी झाली आहे. उठता बसता त्यांचे नाव घेणार्यांनी या घराचा जीर्णोद्धार करुन महामानवाच्या घराला घरपण द्यावे, असे आवाहन गांधी रिसर्च फौंडेशनचे समन्वयक,इतिहासतज्ञ भुजंगराव बोबडे (जळगाव) यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने येथील नगरवाचनालयाच्या पाठक हाँल मध्ये 'मानव मुक्तीचे शिल्पकार'विषय सूत्रावर आयोजित केलेल्या ३२ व्या वर्षीच्या थोरांच्या स्मृती - व्याख्यानमालेचा शुभारंभ 'महात्मा ते महात्मा ' विषयाचे पहिले पुष्प गुंफून भुजंगराव बोबडे यांनी केला. त्या प्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अॅड. हौसेराव धुमाळ, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्था समितीचे सदस्य आनंदराव डोंबाळे व राज्यशास्त्राच्या प्राध्यापक छाया सकटे होत्या.
महामानवाना जाती धर्माचे चौकटीतून बाहेर काढा
बोबडे म्हणाले, बुध्द, कबीर, बसवेश्वर, फुले,आंबेडकर,गांधी यांनी मानवतेचे महान मूल्य समाजाला दिलेय त्याचा आपल्याला विसर पडला आहे.ही मूल्य जोपासण्याची गरज आहे. दुर्दैवाने मानवतेचे तत्वज्ञानाचा इतिहास शिकवला जात नाही. शिवाजी महाराजांच्या सह सर्वच महामानवांना जाती धर्मात बंदिस्त करण्यात येत आहे. या चौकटीतून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे.
फुलेंचा शेतकर्यांचा आसूड म्हणजे अन्याय शोषण विरुद्धचा संघर्ष आहे. गांधीजींना गुरु मानणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुणे कराराचे स्मरणार्थ पुण्यात युनियन बोर्डिंग काढली. गांधी आंबेडकर यांना परस्परां बद्दल आदरभाव होता हे सत्य समजून घेतले पाहिजे. गांधींच्या हिंद स्वराज्यात बुद्धाचे माणूसकीचे मूल्य आहे. महामानवांच्या प्रेमाच्या भाषेचा आपणास विसर पडला असून समाजात आभाषी प्रेमाच्या नावावर हिंसा बोकाळत आहे.
प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. प्रा. छाया संकटे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.कार्यक्रमास विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते, जाणकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |