02:31am | Jan 25, 2020 |
सातारा : सहाव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांनी टाळ व संबळ वाजून शुक्रवारी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण केले. मात्र प्रशासन व कर्मचारी यांच्यातील चर्चा मात्र निष्फळ ठरली. वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.
इशारा दिल्याप्रमाणे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे लाभ न मिळालेल्या 36 कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी टाळ आणि संबळाच्या गजरात आपले लाक्षणिक उपोषण सकाळी साडेदहा वाजल्या पासून सुरू केले. पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ बारनिशीच्या दर्शनी भागात छत्तीस कर्मचाऱ्यांनी बसकणं मारून लाक्षणिक आंदोलन केले. वेतन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. पालिकेत आस्थापनेवर कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. सुहास पवार यांनी ही आंदोलनात सहभाग घेतला. छत्तीस जणांच्या या आंदोलनामुळे शुक्रवारी पालिकेचे दैनंदिन कामकाज कोलमडले. सीएफसी, आस्थापना, शहर विकास, अतिक्रमण, जनगणना विभाग इ विभाग पूर्णतः बंद होते. काही विभागांचा अपवाद वगळता पालिकेमध्ये पूर्णतः शुकशुकाट होता. या लाक्षणिक उपोषणामुळे दिवसभर कोणतेही काम होऊ शकले नाही. कर्मचाऱ्यांशी चर्चा करायचे सोडून मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे सकाळच्या सत्रात पालिकेकडे लवकर फिरकलेच नाहीत. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपल्या दालनात कर्मचाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा केली. सतरा वर्षाची सेवा व नगर विकास राज्यमंत्र्यांनी 2 मार्च 2016 रोजी दिलेला पदोन्नती व वेतन आयोग अंमलबजावणीचा दिलेला आदेश ही बाजू आंदोलकांनी चर्चेत लावून धरली. उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यावेळी उपस्थित होते. चर्चेची ही फेरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सुध्दा दालनात पार पडली. मात्र त्यांनी नगरपरिषद संचालनालयाकडे बोट दाखवून हा विषयच झटकल्याने चर्चा निष्फळ झाली. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा अधिकार मला नाही. तुमचा प्रश्न डीएमए कार्यालयात प्रलंबित आहे मी काही करू शकत नाही, असे शंकर गोरे यांनी सांगत सहकार्य करण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. मात्र ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यावर चर्चेने मार्ग निघावा. छत्तीस कर्मचाऱ्यांनी पालिकेला तब्बल वीस वर्ष सेवा दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. या प्रश्नाची तड लावण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.
- माधवी कदम, नगराध्यक्ष, सातारा नगरपरिषद सातारा.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |