सातारा : शाहूपुरीतील एलआयसी कॉलनीत बुधवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील तब्बल 7 तोळे वजनाचे 1 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या गंठणावर धूम स्टाईलने आलेल्या दोघांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वट पौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्याबाबत संतापाची लाट उसळली आहे.
सोनाली विजय शिंदे (वय 45, सध्या रा.एलआयसी कॉलनी मूळ रा.किन्हई ता.कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत माहिती अशी, वट पौर्णिमा असल्याने सकाळपासून महिलांची वडाच्या झाडाला पुजण्यासाठी व दर्शनाला जाण्यासाठी गडबड सुरु होती. तक्रारदार सोनाली शिंदे या किन्हईच्या असल्याने त्या तिकडे निघाल्या होत्या. घरातील आवरल्यानंतर गेटजवळ दुचाकी आणली. दुचाकीवर बसल्यानंतर समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. अचानक घडलेल्या या प्रकारानतर परिसरात खळबळ उडाली. संबंधित महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.
महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. गंठण हिसकावल्याचे सांगितल्यानंतर चोरट्यांचा पाठलग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरटे दुचाकीवरुन गायब झाले होते. या घडलेल्या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. संशयितांचे वर्णन घेवून तत्काळ नाकाबंदी करण्यात आली. बुधवारी वट पौर्णिमा असल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्सवात हा सण साजरा होत होता. अशातच सातार्यात चेन स्नॅचर सक्रीय झाल्याचा मेसेज पोलिसांमध्ये फिरल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसही अलर्ट झाले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |