सातारा : अतित ता.सातारा येथे स्टँडनजीक मित्रांसोबत गप्पा मारत असताना अनिकेत देशमुख याचा धारदार चाकूने भोकसून खून केल्याप्रकरणी शुभम शिवाजी जाधव (वय 22, रा.अतित) याला जिल्हा सत्र न्यायाधिश आर.डी.सावंत यांनी जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तो न दिल्यास 6 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, खूनाची घटना 2016 मधील असून चाकूने भोकसून खून करण्यात आला होता.
अनिकेत संजय देशमुख (वय 20, रा.अतित) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खूनप्रकरणी तुकाराम दगडू लांबोर (वय 20, रा.चाफेर, कोयनानगर) या युवकाने बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 10 नोव्हेबर 2016 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अतित येथील एसटी स्टँड परिसरात तक्रारदार तुकाराम लांबोर, अनिकेत देशमुख हे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी शुभम जाधव हा तेथे आला. यावेळी शुभम व अनिकेत या दोघांमध्ये वादावादी होवून भांडणे झाली. या घटनेच्या कारणातूनच शुभम जाधव याने धारदार चाकूने हल्ला केला. भर वर्दळीच्या ठिकाणी शस्त्राने हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यामध्ये अनिकेत देशमुख याच्या पोटात गंभीर वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला व तेथेच खाली पडला. या घटनेनंतर शुभम जाधव तेथून पसार झाला. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली पोलिस ठाण्यात शुभम जाधव याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास सपोनि एन.आर.चौखंडे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षाच्यावतीने अॅड. नितीन मुके यांनी काम पाहिले. न्यायालयात बचाव व सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी शुभम जाधव याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, प्रॉसिक्युशन स्कॉडने यावेळी न्यायालयात मदत केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |