सातारा : जिल्हा न्यायालयाच्या लगतच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) चोरी झाली असल्याची माहिती समोर आली असून चोरट्यांनी रजिस्टर, पावती पुस्तके गायब केल्याने खळबळ उडाली आहे. ठरावीकच रजिस्टर, पावती पुस्तकांची चोरी झाल्याने त्याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मिलिंद रंगराव काटकर (वय ४१, रा.गुरुवार पेठ, सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली असून ते सार्वजिन बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आहे. दि. १९ ते २१ का कालावधीत अज्ञात चोरट्याने पीडब्ल्यूडीच्या स्टोअर रुमचे बंद दाराचे कुलुप तोडले. दि. २१ रोजी ही घटना समोर आल्यानंतर विभागात खळबळ उडाली. गेली चार दिवस त्याबाबत सर्व माहिती व प्राथमिक चौकशी घेतल्यानंतर काही ठरावीक रजिस्टर व पावती पुस्तके चोरी झाल्याचे समोर आले. चोरी गेलेल्या सर्व बाबींची नोंदी घेतल्यानंतर तक्रारदार यांनी गुरुवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पीडब्ल्यूडीच्या स्टोअर रुममधून लेखा महाबळेश्वर व उत्तर कराडचे पावती पुस्तके, लेखा उत्तर कराडचे सन २०११- १२ व त्यापूर्वीचे ठेकेदाराचे रजिस्टर्स, लेखा महाबळेश्वर व उत्तर कराडची देयक फाईल्स, सन २००२-०३ ते २०१०-११ डिपॉझिट रजिस्टर, सन २०१४-१५ व त्यापूर्वीचे १६ अ फॉर्म, सन २०१४-१५ व त्या पूर्वीचे व्हॅट सर्टिफिकेट, डिपॉझिटचे मंजूर प्रस्ताव, उपयोगिता प्रमाणपत्रांची फाईल्स असे चोरीला गेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ही ठरावीक कागदपत्रे चोरीला गेल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |