04:38am | Jun 06, 2019 |
सातारा : सातारच्या ऐतिहासिक मंगळवारतळे जरी आमच्या खाजगी मालकीचे असले तरी सार्वजनिक वापरातच जास्त उपयोगात आलेले आहे. त्यामुळे या तळयाची येथील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून लोकसहभागामधुन स्वच्छता करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आणि प्रेरणादायी आहे. या स्वच्छता उपक्रमास व्यक्तीशः आमच्या वतीने लागेल तर सहकार्य सदैव राहीले असे उद्गार सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
पर्यावरण दिनानिमित्त सातारच्या ऐतिहासिक मंगळवार तळे परिसरातील रहिवासी, नगरसेविका सौ.सुनीता महेश पवार व महेश पवार, राजनशेठ चतुर, माजी नगरसेविका हेमांगी जोशी आदींच्या पुढाकाराने, मंगळवार तळयाची लोकसहभागातुन स्वच्छता करण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसेविका हेमांगी जोशी यांनी सांगीतले की, सध्याच्या काळात पाण्याच्या अस्तित्वातील स्त्रोतांचे जतन करणे ते वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. पर्यावरण -हासामुळे अनेक दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत, पाण्याचे दुर्भिक्ष्य कधी नव्हे ते इतके जाणवत आहे. त्यामुळे मंगळवार तळयाच्या परिसरातील नागरिकांनी एकत्र येवून, केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून ऐतिहासिक मंगळवार तळयाची लोकसहभागामधुन स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आठवडयातुन दोन वेळा कमीत कमी तीन तास स्वच्छता करण्यात येणार आहे. या उपक्रमात लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होणार. स्थानिक व्यक्तींनी एक मिशन म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सहभागी होणारा कोणीही लहान मोठा असा भेदभाव नसून, सामुहिक नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविणेत येणार आहे. चांगल्या कामाला लोकांचा लोकसहभाग निश्चित मिळेल असा विश्वास आहे असे नमुद केले.
यावेळी नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, महेश पवार, नगरसेविका सौ.सुनिता पवार, राजनशेठ चतुर, जेष्ठ पत्रकार शरद काटकर, नितिन नारकर, सुनिता सातपुते,महाडीक,राजेश माने,अक्षय जोशी,मुकूल डांगे,दिलीप जाधव, यांचेसह जेष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |