12:29pm | May 18, 2018 |
सातारा : येथील शासकीय विश्रामगृहामध्ये अमोल एकनाथ कोळेकर (रा. कोंडवे) या मुख्याध्यापकाला भाजपचे सुनील कोळेकर व शिवसेनाचे पदाधिकारी हरिदास जगदाळे यांच्यासह चौघांनी चप्पलने मारहाण करत एक प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असून या प्रकरामुळे सातार्यात विविध चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संदीप मेळाट (रा.दिव्यनगरी), सुनील कोळेकर, हरिदास जगदाळे व अनोळखी एक असा चौैघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये सुनील कोळेकर, संदीप मेळाट हे दोघे भाजप तर हरिदास जगदाळे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. दरम्यान, याप्रकरणी अमोल एकनाथ कोळेकर (वय 37, सध्या रा.कोंडवे ता.सातारा मूळ रा.झरे ता.आटपाडी जि.सांगली) यांनी तक्रार दिली असून ते स्वत: रयत शिक्षण संस्थेच्या रा.ब.काळे जीवन शिक्षण मंदीर मंगळवार पेठ, सातारा या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. दि. 16 रोजी दुपारी बारा वाजता तक्रारदार अमोल कोळेकर यांना ‘मी, हरिदास जगदाळे बोलतोय, तुमी लगेच सर्किट हाउसला या. तुमी आला नाही तर भारी पडेल,’ असा फोन आला. एक वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अमोल कोळेकर हे एका सहकार्याला घेवून सर्किट हाउस येथे गेले. त्यावेळी संशयितांनी 9 नंबरच्या खोलीत येण्यास सांगितले. 9 नंबरच्या खोलीमध्ये ते गेल्यानंतर संशयितांनी कोळेकर यांच्यासोबत आलेल्या सहकार्याला तेथून बाहेर जाण्यास सांगितले व आतून कडी लावून घेवून तक्रारदार अमोल कोळेकर यांना कोंडले. यावेळी संशयितांनी लाथा, बुक्क्यांनी तसेच चप्पलने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
अमोल कोळेकर यांनी मारहाणीचे कारण विचारल्यानंतर एक प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामी करणार असल्याचे सांगून घरावर व शाळेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला. तसेच संशयितांनी स्वत:कडे रिव्हॉल्वर, तलवार असल्याचे सांगून खून करण्याची धमकीही दिली. ही सर्व घटना बुधवारी दुपारी घटना दुपारी 1 ते 4 या कालावधीत सर्किट हाऊस येथे घडली आहे. दरम्यान, दुपारी चारनंतर सर्व संशयित तेथेच तक्रारदार यांना सोडून निघून गेले.
या घटनेनंतर तक्रारदार अमोल कोळेकर यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी बुधवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सपोनि श्रीकृष्ण पोरे करत आहेत. दरम्यान, भाजप- सेना पदाधिकार्याकडून मुख्याध्यापकला थेट मारहाण करत खंडणीची मागणी झाल्याने सातारामध्ये खळबळ उडाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |