सातारा : ट्रॅक्टर पुढे घेतल्याच्या कारणावरुन बुधवारी रात्री किडगाव (ता.सातारा) येथील महादेव मंदिर तसेच ग्रामपंचायतीजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी होवून राडा झाला. यात सहा जण जखमी झाले असून दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने एकूण 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वर राजाराम वाघमळे हे बुधवारी रात्री ट्रॅक्टर घेवून गावातील महादेव मंदिराजवळ असणार्या तिकाटण्यावर आले होते. या मार्गावरुन देवीची मिरवणूक निघाली होती. देवीची मिरवणूक तसेच एका पाठोपाठ दोन बसेस तेथे आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे वाघमळे यांनी ट्रॅक्टर पुढे घेतला. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय विठ्ठल इंगवले, अक्षय मारुती इंगवले, गौरव प्रदीप इंगवले, मयुर संपत इंगवले, प्रवण शंकर टिळेकर, अनिकेत राजेंद्र इंगवले व इतर 10 ते 12 जणांनी लाकडी दांडक्याने वाघमळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्यांवरही त्यांनी हल्ला चढवला. यात सुहास जाधव, भागवत जाधव, अक्षय जाधव, ओमकार जाधव, अमजद कुरेशी हे लाकडी दांडकी, दगडे लागल्याने जखमी झाले आहेत. वाघमळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गौरव इंगवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याचप्रकरणी संगिता प्रदिप इंगवले यांनी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की दि. 10 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास राहत्या घराजवळ तसेच गावातील कॅनॉलजवळ जमावाने अक्षय विठ्ठल इंगवले याला मारहाण केली.तसेच जमावाने घरात घुसून मुलगा कोठे आहे, असे विचारत तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर राजाराम वाघमळे, अमजद रमजान मोकाशी, हनुमान जाधव, भागवत जयसिंग जाधव, ओंकार महादेव जाधव, सुहास शिवाजी जाधव, अक्षय भानुदास जाधव, पप्या ननावरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मारहाणीत अक्षय विठ्ठल जाधव हा जखमी झाला आहे.
दरम्यान, या अभुतपूर्व राड्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक विजय चव्हाण व गीते करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |