07:48pm | Mar 24, 2020 |
फलटण : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र फलटणमधील एका गावात परदेशातून आलेल्या एका व्यक्तिला होम क्वारंटाईन केले असतानाही त्याने सतत घराबाहेर पडून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आज त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील याबाबतची ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका गावात दि. 15 मार्च रोजी परदेशातून मूळची त्याच गावातील असलेली व्यक्ती आलेली होती. शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्या गावातील पोलीस पाटील यांनी याबाबतची सूचना जिल्हा प्रशासनाला दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्वरित संबंधित व्यक्तिची तपासणी करुन त्याला होम क्वारंटाईन केले होते. त्याबाबतची नोटीसही दि. 21 मार्च रोजी त्याला बजावली होती. परंतू असे असतानाही 24 मार्च रोजी संबंधित व्यक्ती होम क्वारंटाईन केले असूनसुद्धा घराबाहेर मॉर्निंग वॉकला पडली होती. याबाबतची माहिती त्या गावातील नागरिकांसह पोलीस पाटलांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित याबाबतची तक्रार बरड पोलीस दूरक्षेत्रात दिली. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्या होम क्वारंटाईन व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईन व्यक्तींना घराबाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली होती, त्यासंबंधीच्या नोटीसाही संबंधितांना बजावल्या होत्या. परंतू होम क्वारंटाईन व्यक्ती स्वत:बरोबर समाजाचाही जीव धोक्यात घालत असल्यामुळे आज फलटण तालुक्यात जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |