कराड : शहरातील कोल्हापूर नाका येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या सुमारे ५५ लाख रूपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या उद्घाटन सोहळ्यावेळी कमानीवर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या अक्षरांवर केलेल्या विद्युत रोषणाईची चाचणी न घेतल्याने 'यशवंतराव चव्हाण साहेब प्रवेशद्वार' यावरील काहीच अक्षरे दिसून येत होती. काही अक्षरे दिसून येत नव्हती.
ऐन उद्घाटनप्रसंगी नगरपालिकेच्या या गलथान कारभाराचे हसे झालेच पण यामुळे शहराची अब्रुही नगरपालिकेच्या भोंगळपणामुळे गेली. या प्रकारची नागरिकांमधून उलटसुलट चर्चा झालीच पण अक्षरे गायब असणारा व्हिडीओ व नेते, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याच कमानीखाली काढलेले फोटो सर्वत्र व्हायरल होवून पालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले. असे करून पालिकेने चव्हाण साहेबांचा अवमान केला असून संबंधितानी माफी मागावी अशी मागणी लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या कमानीचा निधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर करुन आणला. मात्र त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्याची चर्चा सुरु असतानाच हा प्रकार झाल्याने याची जोरदार चर्चा सुरु होती. या अगोदरच्या सत्ता कालावधीत प्रोटोकॉलच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरे झिंझवणारे बाबा समर्थक मात्र आता यावर तोंड बंद करून बसले आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |