01:10am | Apr 06, 2020 |
सातारा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. हा जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करीत आज रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाईट बंद करुन दिवे किंवा मोबाईल बॅटरी सुरु करण्याचे आवाहन शुक्रवारी केले होते. या आवाहनाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण शहरात घराघरांत मेणबत्त्या, मोबाईलचे फ्लॅश लावून फटाके फोडत गो कोरोनाच्या घोषणाही दिल्या.
देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 3 हजार 588 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये 99 लोकांचा बळीही गेला आहे. असे असताना परवा म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे, त्यांना या अंध:कारातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच आज दि. 5 रोजी रात्री 9 वाजता तुमची 9 मिनिटे हवी आहेत, असे आवाहन करीत घरातील सर्व लाईट बंद करुन दिवे, मेणबत्त्या, बॅटरीचे तसेच मोबाईलचे फ्लॅश लाईट लावण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देवून आज देशभरासह सातारा शहर तसेच जिल्ह्यातही लाखो लोकांनी आपल्या घर, इमारतीमधील लाईट नऊ वाजता बंद करुन मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येवून घोषणा तसेच फटाक्याची आतषबाजीही केली. एकूणच मोदींनी केलेल्या दुसर्या आवाहनालाही सातारकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मात्र, असे असतानाच आज जिल्ह्यातील एका गावात मुंबईवरुन आलेल्या एक 54 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 झाली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |