कराड : भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी युवकाचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना रेठरे कॉलनी (ता. कराड) येथे बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. अनिकेत राजेश रसाळ (वय 24, रा. कार्वे, ता. कराड)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद अभिक्रांत राजेश रसाळ (वय 29, रा. कार्वे, ता. कराड) यांनी ग्रामीण पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जयदीप शंकर रसाळ, रविराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत रसाळ त्याचा भाऊ अभिक्रांतबरोबर सेंट्रीग काम करत होता. अनिकेतचे जयदीप रसाळ याच्या भाचीबरोबर प्रेमसंबंध होते. जयदीप रसाळ व रविराज रसाळ हे मूळचे कार्वे येथीलच परंतु कामानिमित्त ते रेठरे कॉलनी येथे राहत होते. अनिकेतची यापूर्वी अनेक वेळा जयदीप रसाळ व रविराज रसाळ यांच्याशी वादावादीही झाली होती. मंगळवार दि. 12 रोजी जयदीप रसाळ याच्या भाचीचे लग्न झाले होते. त्यावेळी अनिकेत हा बुधवारी रेठरे कॉलनी येथे गेला होता. त्यावेळी जयदीप रसाळ व रविराज रसाळ या दोघांनी भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून अनिकेत यास घराच्या पाठीमागील बाजूस नेवून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केली. यात अनिकेतचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी भेट दिली.
याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी जयदीप रसाळ व रविराज रसाळ या संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |