06:11pm | Mar 31, 2020 |
फलटण : कोरोना (कोविड-19) संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आज माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोशल डिस्टन्सिंगचा संदेश देत माळशिरस तालुक्याच्या प्रांताधिकारी व इतर अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोनाच्या अनुषंगाने तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.
संपूर्ण देशासह राज्यावरही कोरोना ही महाभयंकर आपत्ती येवून ठेपली आहे. केंद्र शासनासह राज्य सरकारही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठा प्रयत्न करीत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यापूर्वीच आपल्या खासदार स्थानिक विकास निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी 30 लाखांचा निधी दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात येणार्या फलटण-कोरेगाव, माण-खटाव, माळशिरस, सांगोला-पंढरपूर, माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघातील जनतेला कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ठेवण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे येणार्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे आज खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माळशिरस प्रांत कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी व इतर अधिकार्यांसमवेत संवाद साधला. तसेच माळशिरस तालुक्यातील उपाययोजनांचा आढावा घेत आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आणीबाणीच्या प्रसंगी इतर लोकप्रतिनिधींसारखे घरात न बसता तंत्रज्ञानाचा वापर करीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामान्य जनतेला येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |