10:56pm | Oct 05, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांनी कुमठे, ता. कोरेगाव येथील हनुमान मंदिरात सुरु असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून विनापरवाना बेकायदेशीर पैशावर जुगार खेळणार्या कुमठे गावातील 19 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याजवळील 63 हजार 185 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. रात्री उशिरा सक्षम पोलीस अधिकार्यांसमोर उभे करुन सर्वांच्याकडून बॉण्ड लिहून घेवून सर्व आरोपींना टेबल जामीन देवून सोडून देण्यात आले.
याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमठे, ता. कोरेगाव येथील हनुमान मंदिरात बेकायदेशीर तीन पानी पत्त्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती खबर्याकडून कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दि. 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये बेकायदेशीर तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणार्या संभाजी जगदाळे (वय 49), बळवंत चव्हाण (वय 57), किशोर जगदाळे (वय 46), विश्वास तांबे (वय 65), दशरथ चव्हाण (वय 75), श्रीकृष्ण चव्हाण (वय 37), प्रदीप जाधव (वय 47), जावेद खान (वय 45), बशीर मणेर (वय 50), विनायक वाघ (वय 73), जयसिंग जगदाळे (वय 74), बाळकृष्ण लोहार (वय 66), सिकंदर आतार (वय 65), समाधान चव्हाण (वय 32), प्रमोद उर्फ मुका जगदाळे (वय 48), सदाशिव जगदाळे (वय 62), गणेश पुरी (वय 42), लतिफ मुलाणी (वय 32), गणेश दडस (वय 18) सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव यांना अटक करण्यात आली. यावेळी जुगारासंबंधीची 63 हजार 185 रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले. या सर्वांनी योग्य व लायक जामिनदार दिल्याने रात्री उशिरा सर्वजणांना जामिनावर मुक्त करण्यात आले.
कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोरेगाव शहरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली आणि सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कटटे यांनी कोरेगाव शहरातील मटका अड्ड्यावर धाड टाकून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर कट्टे यांनीच पुन्हा कुमठे, ता. कोरेगाव येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून 19 जणांना अटक करुन 63 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सातारा पोलिस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव परिसरातील मटक्यांच्या आणि जुगारांच्या अड्ड्यावर धाडी टाकत असताना कोरेगावचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा गप्प कसे बसले आहेत, याबद्दल शहर परिसरात अर्थपूर्ण चर्चा सुरु आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |