नागपूर : ऑरेंज सिटीतील आघाडीचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी इतिहास घडवताना जगातील सर्वांत आव्हानात्मक रेसपैकी एक असलेली रशियातील रेड बुल्स ट्रान्स-सायबेरियन एक्स्ट्रीम (९१०० किलोमीटर) शुक्रवारी पूर्ण करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारे डॉ. समर्थ हे भारतातील पहिले सायकलपटू ठरले.
मॉस्को येथे २४ जुलै रोजी फ्लॅग ऑफ झालेल्या या रेसचे २५ दिवसात १५ टप्पे पूर्ण करायचे आव्हान होते. अखेर चारच सायकलपटूंनी शुक्रवारी व्लादिवस्तक ‘फिनिशिंग पॉर्इंट’ गाठला. पीटर बिश्चॉपने ३१५ तास ४५ मिनिट २८ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर मायकल कनूडसेन (३३३.१३.०४), मार्सिलो फ्लोनटिनो सोरेस (३४६.१९.००) आणि अमित समर्थ (३४७.१६.१७) यांचा क्रमांक येतो. डॉ. समर्थ यांनी निर्धारित वेळेत नियोजित टप्पा गाठल्यानंतर रेड बुल्स संघाने जल्लोष करण्यास प्रारंभ केला.
यापूर्वी, गेल्या वर्षी रेस अॅक्रॉस अमेरिका (आरएएएम) ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिट वेळेत पूर्ण केल्यापासून डॉ. अमित समर्थ चर्चेत आले होते. पाच हजार किलोमीटर अंतराची ही शर्यत समुद्र किनाऱ्यावरुन कॅलिफोर्निया ते अॅनापोलिश, मॅरीलँड या मार्गावर झाली होती. ही शर्यत पूर्ण करणारे डॉ. समर्थ पहिले भारतीय ठरले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी रशियातील खडतर शर्यत पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. अखेर अथक परिश्रम घेत त्यांनी आज खडतर रेस पूर्ण केली. अमित यांनी बुधवारी ६९० किलोमीटर अंतराचा १४ वा टप्पा पूर्ण केला होता. १५ वा म्हणजेच ७०० किमी अंतराचा निर्णायक टप्पा शुक्रवारी गाठत त्यांनी ऐतिहासिक पराक्रम केला.
डॉ. समर्थ यांची कामगिरी
* रेस अॅक्रॉस अमेरिका (पाच हजार किलोमीटर अंतर) ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्या प्रयत्नात पूर्ण करण्याचा पराक्रम.
* आयर्न मॅन आणि रेस अॅक्रॉस अमेरिका पूर्ण करणारे एकमेव भारतीय
* इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित डेक्कन क्लिफहँगर २०१७ (पुणे ते गोवा ६४३ किलोमीटर अंतर) रेस २५ तास २८ मिनिट वेळेत पूर्ण करीत जेतेपदाला गवसणी
* बुसेलटोन (ऑस्ट्रेलिया) येथे ४ डिसेंबर २०१६ रोजी ११ तास ५४ मिनिट वेळेत (३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे) रेस पूर्ण करीत पूर्ण आयर्नमॅनचा किताब.
* ११ वेळा आयर्नमॅन ७०.३ रेस फिनिश करण्याची कामगिरी. ३० ते ३९ वयोगटात ७०.३ आयर्नमॅन विभागात अव्वल मानांकित अॅथ्लिट.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |