02:39am | Apr 11, 2019 |
सातारा : सातारा शहर परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांना अटक केली. यावेळी जुगाराच्या साहित्यासह तब्बल 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने जुगारबाजांमध्ये खळबळ उडाली असून कारवाईनंतर पोलिसांनी जुगारअड्डा उध्वस्त केला आहे.
नितीन रमेश कांबळे, विजय दत्तू लोंडे, संजय सिकराप्पा कांबळे, ऋषीकेश संतोष सांडभोर, अफजल मुस्तकीम मणीहार, पांडूरंग खाशाबा लोखंडे, शंकर राम हरिजन, विलास अमृतराव जाधव, अरविंद कृष्णा सपकाळ (सर्व रा.कृष्णानगर, सदरबझार, शाहूपुरी, सातारा) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय कार्यालयाच्या पथकाला मिळाली. या माहितीनंतर पोलिसांचे एक पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. यावेळी संशयित टोळीच्या माध्यमातून जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची रेड पडल्याचे लक्षात येताच संशयित जुगारबाजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाला वेढा देत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता रोख 9300 रुपये, 6 मोबाईल, 2 दुचाकी असा एकूण 1 लाख 52 हजार 795 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडला. पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मुद्देमाल जप्त करुन पोलिसांनी ज्या छपरात हा अड्डा सुरु होता तो अड्डा उध्वस्त केला. यानंतर संशयितांना शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक करण्यात आली.
सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार इनायतुल्ला मुल्ला, सचिन पाटील, अंकुश यादव, मनोज शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |