02:48am | Mar 24, 2020 |
सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या खबरदारीनंतरही आज एक 45 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचाही युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना न घाबरता घरातच बसून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे हाहाकार माजलेला आहे. असे असताना राज्य सरकार व जिल्हा प्रशासन कोरोना च्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. काल दि. 22 रोजी एका 45 वर्षीय दुबईवरुन आलेल्या महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. दरम्यान, संबंधित महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एन. आय. व्ही. कडे पाठविण्यात आले होते. आज त्या महिलेचा रिपोर्ट सातारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना मिळाल्यानंतर संबंधित महिला कोविड-19 (कोरोना) संसर्गित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेला गेल्या 15 वर्षापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सध्या तिचा रक्तदाब नियंत्रणात आहे, तसेच त्या महिलेवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु असून प्राथमिक तपासणीनंतर त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, सातार्यात कोरोना संसर्गित पहिला रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर व त्यांच्या सूचनांचे पालन करीत आज सायंकाळपासून सातारा जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असून जिल्ह्यातील एकही व्यक्ती विनाकारण जिल्ह्यात येवूही शकणार नाही आणि जाऊही शकणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-19 (कोरोना) बाधित एक रुग्ण सातारा जिल्ह्यात निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता घरातच बसून कोरोनाचा सामना करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. ‘मीच माझा रक्षक’ म्हणून स्वयंस्फूर्तीने नागरिकांनीच आपली काळजी करावी, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |