01:29am | Dec 12, 2019 |
वाई : येत्या रविवारी (ता. 15) संपन्न होणार्या गरवारे वाई हिलसाईड हाफ मॅरेथॉनसाठी वाईकर आणि देश-विदेशातील स्पर्धक सज्ज झाले आहेत. या आरोग्यदायी चळवळीला सलग दुसर्या वर्षी चांगला प्रतिसाद लाभला आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत 3 हजार स्पर्धक सहभागी होत असून 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देशातील नामवंत स्पर्धकांसह इथोपिया, केनिया आदी परदेशातील स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष दीपक ओसवाल यांनी दिली.
द्रविड हायस्कूलच्या कोर्टाशेजारील गेटपासून सकाळी 6 वाजता या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. सुरवातीला 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन व साडेसात कि.मी. ग्लॅडिएटर रन स्पर्धेची सुरवात होणार आहे. त्यानंतर तीन कि.मी. फन रनला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी टर्निंग पाँईटवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. स्पर्धा मार्गावर सुमारे 300 स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट, कमांडो तैनात असणार आहेत. वाईच्या निसर्गरम्य परिसरातून जाणार्या स्पर्धेच्या मार्गावर आठ ठिकाणी ‘वॉटर स्टेशन्स’ असणार आहेत. याठिकाणी एनर्जी ड्रिंक, पाणी देण्यात येणार आहे. स्पर्धा मार्गावर पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या पथकाद्वारे स्पर्धकांचे स्वागत केले जाणार आहे.
सकाळी 8.15 पासून बक्षिस वितरण सोहळ्यास सुरुवात होणार आहे. यावेळी गरवारे टेक्निकल फायबर्सचे वायू गरवारे, मयूरी गरवारे, आ. मकरंद पाटील, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी.व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, चौगुले इंडस्ट्रिजचे प्रमुख अधिकारी, ओंकार डेव्हलपर्सचे सुनिल संकपाळ, डॉ. संदिप काटे, डॉ. देव, प्रणव आर्टस्चे उदय गुजर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांच्या वॉर्मअप साठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. 14 रोजी स. 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत साठे मंगल कार्यालय येथे सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, बॅग आदी किटचे वाटप केले जाणार आहे. वाईच्या नावलौकिकात भर घालणार्या स्पर्धेसाठी वाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष दीपक ओसवाल, रेस डायरेक्टर राजगुरु कोचळे, सचिव धोंडिराम वाडकर, टेक्निकल हेड नंदकुमार माने तसेच टीम वाईच्या सदस्यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |