01:52am | Mar 29, 2020 |
सातारा : कोरोना (कोविड-19) व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना बरा करण्यासाठी सध्या कोणतेच खात्रीशीर असे औषध उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक देश हतबल झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशांनी लॉक डाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही वैद्यकीय सल्लागारांनी ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ औषध फायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच औषध दुकानांमधील ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’चा साठा संशयास्पदरित्या गायब झालेला आहे. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाला याबाबत काही माहिती आहे काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ (HCQS) औषधाने कोरोनाचा प्रभाव घटतो, असा दावा अनेक संशोधकांनी केलेला आहे. आज तर चक्क एका वृत्तवाहिनीवर भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) चे अध्यक्ष नमन गंगाखेडकर यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मेडिकल्ससह स्टॉकिस्ट कडे अनेकांनी ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ मिळविण्यासाठी गळ घातली. परंतू या औषधाचा साठा अगोदरच संपल्याचे सर्व मेडिकल चालकांनी सांगितले, तर काहींनी जिल्हा प्रशासनाने ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’चा साठा ताब्यात घेतल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ हे औषध कोरोनाच्या उपचारासाठी अंतिम औषध नसल्याचे ठणकावून सांगितल्यानंतरही सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी जादूची कांडी सापडावी, अशा पद्धतीने जिल्ह्यातील मेडिकल्समध्ये धाव घेतली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वत:सह कुटूंबालाही होम क्वारोंटाईन करुन घेतले आहे. घरबसल्या काहीच काम नसल्याने सातत्याने कोरोनाचा जगभरातील तसेच देशभरातील वाढत असलेल्या आकड्यांमुळे लोक विचलित होत आहेत. लवकरात लवकर कोरोनावर औषध सापडावे व घरातून आपली सुटका व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे. अशावेळी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे अध्यक्ष नमन गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषद घेवून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’च्या सेवनामुळे कोरोनाचा प्रभाव घटतो, असे सांगितले. यानंतर अनेकांनी मेडिकलमध्ये हे औषध संपले आहे, असे समजल्यानंतर थेट राजकीय तसेच जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी हे औषध मिळण्यासाठी याचना केल्या आहेत. परंतू एवढे करुनही अनेकांना हे औषध मिळालेच नाही. ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ हे औषध मुख्यत्वे ताप, मलेरियासाठी वापरले जाते. त्याच औषधाचा वापर कोरोनासाठी होवू शकतो काय, यासंबंधीचे सखोल संशोधन आयसीएमआर द्वारा केले जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मेडिकल्स तसेच स्टॉकिस्टकडील ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ (HCQS) चा साठा संपलाच कसा, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, तसेच ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मेडिकल्समधून दिले जावे, असा कायदा आहे. मात्र असे असतानाही डॉक्टरांच्या चिठ्ठीविना मेडिकल्समधून ही औषधे गेली कुठे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने याबाबीमध्ये लक्ष घालून ‘हायड्रोक्सीक्लोरिक्विन’ बाबत खुलासा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |