01:56am | Jan 15, 2020 |
कराड : देशात रस्ते अपघातात लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. ज्यामुळे देशाचे नुकसान होते, तसेच मोठया प्रमाणात जीवीतहानी होेते. असे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे असे प्रतिपादन कराड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक अरविंदकुमार देसाई यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सातारा पोलीस, कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने 31 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमीत्त ऊस वाहतुक करणार्या वाहनांना रिल्फेक्टर लावण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कराड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयचे मोटार वाहन निरीक्षक संदीप देसाई, संचालक दयानंद पाटील, पांडूरंग होनमाने, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, अशोक लोहार, शरद मोरे, एस. डी. जिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. अरविंदकुमार देसाई पुढे म्हणाले, वाहनचालकांनी व्यसन करू नये. व्यसन करून वाहने चालवू नये. वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाने वाहने चालवू नयेत. वाहन चालवताना वाहनांमध्ये मोठ्याने गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नये हे नियमांचे वाहन चालकांनी पालन करावे ज्यामुळे अपघात रोखता येतील.
जर या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले तर प्रशासनाकडून तसेच कारखान्याकडून सदर वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहीती मोटार वाहन निरीक्षक संदीप देसाई यांनी दिली. संचालक दयांनद पाटील म्हणाले, कृष्णा कारखाना कर्मचारी, उसतोड मजूर व तोडणी वाहतूकदार यांची काळजी नेहमी घेत असतो. वाहनचालकांनी वाहतूकीचे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन दयांनद पाटील यांनी केले. यावेळी ऊस वाहतूक करणार्या वाहनांना मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर व रेडीयम लावण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सेके्रटेरी मुकेश पवार, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, वाहतुक अधिकारी गजानन प्रभुणे, सुरक्षा व पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, लेबर ऍण्ड वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, असि.जनरल मॅनेजर डिस्टीलरी प्रतापसिंह नलवडे, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, पर्चेस ऑफिसर रविंद्र देशमुख, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, कार्यालयीन अधिक्षक निलेश देशमुख, सॅनेटेरी ऑफिसर विजय पवार, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल निकम, सहा.शेती अधिकारी अजय दुपटे, सहा.ऊस विकास अधिकारी शिवाजी बाबर, आदींसह अधिकारी व कर्मचारी व वाहन चालक उपस्थित होते. सेेके्रटेरी मुकेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी आभार मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |