02:12am | Jul 18, 2019 |
सातारा : तीन दिवसांपूर्वी खंडाळा येथे झालेल्या पाणी परिषदेमध्ये फलटण येथील एका ज्येष्ठ नेत्याने (फलटण नरेश) पाणी परिषद उधळून लावण्याची व माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांच्यावर दगडफेक करण्याची सुपारी मुंबई व पुण्यातील गुंडांना दिल्याचे समोर आल्याने, ‘कुठेही बोलवा, कधीही बोलवा; हा रणजीतसिंह निरा - देवघरच्या पाण्यासाठी केव्हाही यायला तयार आहे’, असे प्रतिआव्हान खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांनी फलटण नरेशांना दिले आहे.
गेली दोन दशके सातारा जिल्ह्याच्या हक्काचे सुमारे ७० टीएमसी पाणी स्वत:चे पद वाचवण्यासाठी स्वत:ला भगिरथ समजणाऱ्या फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने (फलटण नरेश) बारामतीला दिले होते. स्वत:च्या घरातील मुलांना उपाशी ठेवून सवतीच्या मुलांना बासुंदी भरवणाऱ्या स्वयंघोषित भगिरथ (फलटण नरेश) यांच्याविरोधात खंडाळा येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे पाणी परिषदेचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान, उपाध्यक्ष एस. वाय. पवार, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, नानासाहेब राणे, बकाजीराव पाटील, पुरूषोत्तम जाधव, नितीन भरगुडे - पाटील, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, उपसभापती वंदना धायगुडे, राजेंद्र नेवसे, डॉ. विजय शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती.
या परिषदेत फलटण, खंडाळा तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टीका करण्यात आली होती. त्यामुळे ही परिषद उधळून लावण्यासाठी व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांच्यावर दगडफेक करून पाणी परिषदेत जीवितहानी घडवण्याच्या उद्देशाने फलटण येथील ज्येष्ठ नेते (फलटण नरेश) यांनी मुंबई - पुण्यातील गुंडापुंडांना सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते. या सुपारीकांडाचा तपास सातारा पोलीसही करत आहेत. बेसावधपणे पाठीत खंजिर खुपसणाऱ्या अफझलखानी प्रवृत्तींचा खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेत निरा - देवघरचे पाणी तसेच माढ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कुणालाही भिडण्यास तयार आहे. तुम्ही वेळ सांगा. दिल्ली, बारामती व फलटण या ठिकाणी कुठेही बोलवा, कधीही बोलवा; हा रणजीतसिंह केव्हाही यायला तयार आहे, असे प्रतिआव्हान रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांनी दगडफेकीची सुपारी देणाऱ्यांना दिले आहे. सुपारीबाजांना नियतीने माफ केले तरी हा रणजीतसिंह कधीच माफ करणार नाही. निरा - देवघर व धोम - बलकवडीच्या पाण्यावर गेली दोन दशके या पाणी माफियांनी खंडाळा - फलटणच्या जनतेला झुलवत ठेवले. निवडणुका आल्या की आदर्कीच्या माळरानावर पाणी सोडून मतांचे जोगवे मागितले. मात्र आता हिशेब चुकता करण्याची वेळ आलेली आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक - निंबाळकर यांनी निरा - देवघर व धोम - बलकवडीच्या पाण्यासाठी लढा दिला. प्रसंगी आंदोलने केली. मात्र चोरपावलांनी आलेल्या स्वयंघोषित भगिरथांनी आमचे श्रेय लाटून स्वत:च्या राजकीय कोटकल्याण करून घेतले. पाणी परिषदेच्या माध्यमातून आपले पाप बाहेर पडते की काय अशी भीती वाटल्यानेच पाणी परिषदेवर भाडोत्री गुंडांकरवी दगडफेक करण्याचे मनसुबे त्यांनी रचले होते. मात्र ते उधळले गेले आहेत. पाणी परिषदेस आलेल्या गोरगरीब जनतेवर दगडफेक करण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा गर्भित इशारा खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांनी सुपारीबाजांना दिला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |