कराड : 1991 साली मला तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे मी लोकसभेला निवडून आलो. तेथून माझी राजकीय वाटचाल सुरु झाली. त्यामुळेच मी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री पदापर्यंतच्या पायऱया चढू शकलो. त्या जोरावर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे मला करता आली. कोळे विभागाचे चौपदरी रस्त्यामुळे स्वरुप बदलले आहे. यामुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहाराला चालना मिळाली. सहाजिकच अर्थिक सक्षमता आली. या विभागात विकासाची आणखी कामे वेगाने करण्यासाठी मी कटिबध्द आहे. मला या निवडणूकीत आशीर्वाद द्या.
असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कोळे येथे लोकसभा व विधानसभा निवडणूकीनिमित्त आयोजीत प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, मला तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे मी अनेक पदापर्यंत पोहचू शकलो. याची जाणीव ठेवून मी जनसेवेसाठी कार्यरत आहे. मी गावोगावच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. रस्ते निर्माण झाल्यामुळे दळणवळण गतीने होत आहे. परिणामी सर्वसामान्यांचा पायाभूत विकास करण्यामध्ये मला यश आले. त्यामुळे अर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. याचे धोतक तुम्हाला कराड ते ढेबेवाडी चौपदरी रस्त्यामुळे पहायला मिळत आहे.
ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना राज्यात दोन नवे प्रकल्प उभे केले. ते प्रकल्प या सरकारला अद्याप पूर्ण करता आलेले नाहीत. तशाच पध्दतीने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार फंडाव्यतिरिक्त हजारो कोटींचा विकासनिधी मी आणला. याचे जीआर माझ्याकडे आहेत. मला विरोधकांप्रमाणे राजकीय स्वार्थासाठी विकासाची बॅनरबाजी करायची नाही. ते म्हणाले, राज्य व तालुका पातळीवर नेत्यांनी पक्षनिष्ठा सोडून स्वतःचे गाठोळे वाचवण्यासाठी इतर पक्षात उड्या मारल्या असल्या, तरी कार्यकर्ते व जनता कुठेही गेलेली नाही. मराठा समाजाला माझ्या सहीने आरक्षण मिळाले. मुस्लीम समाजाला सहा टक्के आरक्षण देण्याचे धाडस कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आमच्या कुटुंबातील मंडळींनी कॉंग्रेसच्या विचारधारेस दगाफटका करून जातीयवादी पक्षांशी संगत केली आहे. विरोधी उमेदवाराचे स्वकर्तृत्व शून्य आहे. प्रसाद फेकून देण्यापासून विठ्ठलाचे दर्शन मतांसाठी विकणार्या विरोधी उमेदवारास संधी देऊ नका. यशवंतराव मोहिते यांच्या नांवावर मतांचा जोगवा मागण्यासाठी येणार्यांना यशवंतराव मोहितेंचा मुलगा कुठे आहे, हा जाब विचारा. कुटनीतीला बळी न पडता देशाची अखंडता राखण्यासाठी कॉंग्रेसला साथ द्या. समोरच्या लबाड माणसांना घरी बसवूया. व कष्टकर्यांची सत्ता आणण्यासाठी झगडत राहू या.
अजितराव पाटील-चिखलीकर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तमराव खबाले, शिवसेनेचे पदाधिकारी श्री. चोरगे यांच्यासह 55 कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सदस्या नंदाताई यादव, अविनाश नलवडे, विद्याताई थोरवडे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |