11:40pm | May 21, 2018 |
महाबळेश्वर : सुप्रसिद्ध किल्ले प्रतापगड आपल्या कुटुंबियांसमवेत पाहण्यासाठी आलेल्या ओम प्रकाश पाटील (वय १३) या शाळकरी मुलाचा पायऱ्या चढत असताना किल्ल्यावरील एका माकडाचा धक्का लागुन तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड डोक्यावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला व अति रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रतापगडावर सन्नाटा पसरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश पाटील रा. उफाळेवाडी ता. तासगाव जि. सांगली हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत मुलांच्या शाळेला सुट्टी लागली म्हणुन, सहावीची परीक्षा देवुन मोकळा झालेला मुलगा ओम दोन मुली प्रणोती व प्रणाली व पत्नी लता यांचे बरोबर आपल्या वाहनाने महाबळेश्वरच्या सहलीवर आले होते. काल त्यांनी औंध व सज्जनगडाला भेट दिली. आज सकाळी ते महाबळेश्वर दर्शनासाठी बाहेर पडले ऑर्थरसीट व क्षेत्र महाबळेश्वर पाहुन दुपारी त्यांनी महाबळेश्वर येथे जेवण केले थोडी विश्रांती घेवुन दुपारी पावणे तीन वाजता ते किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी बाहेर पडले ते सव्वा तीन वाजता गडाच्या वाहनतळावर पोहचले त्यांनी वाहनतळावर आपली गाडी लावली व ते गडाच्या पायरया चढायला सुरूवात केली. जेथून पायऱ्या सुरू होतात तेथे पायऱ्यावर भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी स्थानिक महीला बसत असतात.
या शेंगा हातात घेवुन पर्यटक गडावर चढत असतात. काही पर्यटक विकत घेतलेल्या शेंगा माकडांना खाण्यास देतात. पर्यटकांनी टाकलेल्या शेगा मिळतील या आशेवर येथे मोठया प्रमाणावर माकडे जमा होतात. ते गडाच्या तटबंदीवर इकडुन तिकडे कायम उडया मारत असतात. अनेक वेळा माकडांना शेंगा दिल्या नाही तर हातातुन शेंगाची पुडी माकडे हिसकावुन घेतात. तसेच अंगावर धावुन येतात परंतु आज प्रकाश पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरचं कोसळला. किल्ले प्रतापगडाच्या पायऱ्या चढत असताना तटबंदीवरील माकडांचा धक्का दगडाला लागला व भला मोठा दगड हा खाली पायऱ्या चढत असलेल्या ओमच्या डोक्यावर पडला या अपघातात ओमचे डोके फुटले. तो जागीच कोसळला ओम कोसळलेला पाहताच ओमच्या आईने व दोन्ही बहीणीने हंबरडा फोडला पाटील कुटूंबाचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांच्या डोळयात पाणी आले. पर्यटक व स्थानिक नागरीक त्वरित पाटील कुटुंबाच्या मदतीला धावले. तातडीने ओमला कुंभरोशी येथील रूग्णालयात दाखल केले परंतु तो जागीच ठार झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |