02:39am | Jul 21, 2019 |
कराड : कराड दक्षिण मतदारसंघात अनेक नावे दुबार नोंदविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नातेवाईकांची नावे दुबार नोंद आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या घराच्या पत्त्यावरच परक्या कुटुंबातील सदस्यही राहत असल्याची नोंद आढळते. अशी दुबार मते असणार्यांची नावे रद्द होत नसतील, तर या दुबार नोंदणीला माजी मुख्यमंत्र्यांचे तर पाठबळ नाही ना? असा सवाल भारतीय जनता पार्टीने उपस्थित केला आहे. कराड दक्षिणमधील दुबार मतांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना आज देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार पुन:निरीक्षण कार्यक्रम आखला असून, याअंतर्गत नवीन मतदारनोंदणी, नावे वगळणे, नावांचे एका मतदारसंघातून दुसर्या मतदारसंघात स्थलांतर करणे याबाबत कार्यवाही सुरू आहे. लोकशाही प्रक्रियेतील महत्वाचा घटक असणारा मतदारराजा मताच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनस्तरावरूनच हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीनेही कराड दक्षिण मतदारसंघात शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. या जागृती अभियानाच्या निमित्ताने काही धक्कादायक बाबी आमच्या निदर्शनास आल्या असून, लोकशाही प्रक्रियेस त्या घातक ठरणार्या आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात अनेक नावे दुबार नोंदविण्यात आली आहेत. म्हणजेच एकाच विधानसभा मतदारसंघात दोन स्वतंत्र गावांमध्ये ही नावे नोंद असून, संबंधित लोक ज्या-त्या निवडणूकीत दोनदोनदा मतदानाचा अधिकार बजावताना आढळून येतात.
उदाहरण द्यायचेच झाल्यास कराड दक्षिणचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या एका नातेवाईकाचे नाव मलकापूर व खुबी येथेही आहे. त्यांच्या सख्या बहिणींचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली. त्या परगावी राहत असतानाही त्यांची नावे मात्र गेली अनेक वर्षे मलकापूरातच असलेली दिसून येतात. त्यांची नावे त्या ज्या गावी राहतात, तेथेही दुबार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नव्हे; तर मनोहर शिंदे यांच्या घराच्या पत्त्यावरच (भाग क्र. 159 - घर क्र. 115) शिंदे यांच्या कुटुंबीयांबरोबरच मुजावर, शेख, बुधावले, जमदाडे आदींच्या कुटुंबातील सदस्यही राहत असल्याची नोंद आढळते. दुबार मत असणार्यांची नावे स्वत: मनोहर शिंदे यांच्या घरातही नोंद असतील, तर ती नावे रद्द न करण्याबाबत काहीही कार्यवाही का होत नाही?
राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे प्रगतीकडे वाटचाल करणार्या कराड तालुक्यात आसपासच्या अनेक तालुक्यातील लोकं शिक्षण, व्यवसाय, नोकरीच्यानिमित्ताने गेली अनेक महिने-वर्षे राहत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जे लोक शिक्षण-नोकरी-व्यवसायाच्यानिमित्ताने एका मतदारसंघातून दुसर्या मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत, अशांना योग्य रहिवाशी पुरावे सादर करून आपले मतदानही स्थलांतर करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यानुसार एखाद्या शिक्षण अथवा उद्योग समूहात कार्यरत असणारे मतदार स्वेच्छेने आपला घटनात्मक अधिकार वापरून, योग्य रहिवाशी पुरावे सादर करून मतदान स्थलांतरीत करत असतील तर त्याला कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण विरोधी पक्षांतील काही समाजविघातक शक्ती मात्र समाजात संभ्रम निर्माण करून मतदारांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणू पाहत आहेत. अशा शक्तींना प्रशासनाने वेळीच आवर घालून जनतेच्या नागरी हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच मतदारयादीत अनेक मयत मतदारांची नावे अजूनही नोंद असून, या नावांवर आक्षेप घेऊन ती वगळण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी खराडे यांनी या प्रकरणाची योग्य ती शहानिशा करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची ग्वाही भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, मलकापूरचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, संजय शेवाळे, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, उमेश शिंदे, धनाजी जाधव, सूरज शेवाळे, बाळासाहेब घाडगे, हेमंत धर्मे, सुरेश खिलारे, रमेश मोहिते, बाळासाहेब बागडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुबार मत नोंदविणार्यांवर गुन्हा दाखल करा
मनोहर शिंदे यांच्या घर क्र. 115 वर नोंदविलेल्या मतदारांची संपूर्ण चौकशी प्रत्यक्ष सुनावणी व भेटी देऊन झाली पाहिजे. या पत्यावर बोगस मते नोंदविलेली आढळल्यास संबंधितांवर गुन्हेगारीचा खटला दाखल करावा. ज्यांनी आपल्या घरात बोगस मतदान नोंदविले आहे व ते जाणीवपूर्वक रद्द करू दिलेले नाही त्यांच्यावर सीआरपीसी / आयपीसी कलम 471 खाली बनावट कागदपत्रे दाखल करण्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |