सातारा : सहायक संचालकांनी कान उपटल्यामुळे ३१ मार्चअखेर 78 टक्के गुण मिळवून सातारा पालिका उत्तीर्ण झाली. एकूण मागणी 22 कोटी रुपये असताना 14 कोटी 67लाख रुपये कर रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. हा कर वसूल करताना काही फ्लॅटसह 31 मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या, तर तब्बल १23 कुटुंबांची नळ कनेक्शन तोडण्यात आली.
पाणीपट्टी व मिळकत करापोटी सुमारे २३ कोटी रुपये वसूल करण्याचे पालिका प्रशासनापुढे उद्दिष्ट होते. ३१ मार्चअखेर ही वसुली न केल्यास पालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांवर परिणाम होऊ शकतो. परिणामी शहरातील विकासकामांवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेच्या वसुली विभागाने धडक विशेष वसुली मोहीम राबविली. मोहिमेच्या नावात असलेला धडकपणा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर अभावानेच आढळून आला. परिणामी मार्च महिन्यांच्या मध्यावर सातारा पालिका ५५ टक्क्यांच्या आसपास घुटमळत होती.
नगरपालिका प्रशासनाचे सहायक संचालक संजय गायकवाड यांनी साताऱ्यात घेतलेल्या बैठकीत असमाधानकारक वसुली असलेल्या सातारा पालिकेसह जिल्ह्यातील इतर काही नगरपंचायतींचे कान पिळले होते. त्यानंतर सातारा पालिकेच्या वसुली विभागाने धडक मोहीम सुरू केली. त्यामध्ये त्यांनी २५ हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवडक थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांतून जाहीर केली. काही मोबाईल टॉवरचे भाडे थकले होते. असे पाच टॉवर सिल करण्यात आले. दुसऱ्या बाजूस थकबाकीदारांच्या मालमत्ता सिल करून ताब्यात घेण्याचा धडाका सुरूच होता.
पालिकेचे वसुली विभागाचे सहायक कर निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘३१ मार्च अखेर २३ कोटींच्या उद्दिष्टापैकी १८ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली करत असताना वसूल कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या ६५ मालमत्ता ताब्यात घेतल्या. एकूण १६४ थकबाकीदारांची नळकनेक्शन कट करण्यात आली. या थकबाकीदारांनी अद्यापि थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा कायमचा बंद करण्यात येईल.’’
दिवसभरात ५६ लाखांची वसुली
वसुली मोहिमेत पालिकेचे ४२ कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून काम करत आहेत. त्यांनी या काळात शनिवार- रविवार या सुट्याही घेतल्या नाहीत. इलेक्शन ड्यूटी असतानाही (३१ मार्च) दिवसभरात या कर्मचाऱ्यांनी विक्रमी ८७ लाख रुपयांची वसुली केली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |