पिंपोडे बुद्रुक : बिचुकले (ता. कोरेगाव) येथील इयत्ता दहावीत शिकणार्या शुभम रवींद्र पवार (वय 16) याने जनावरांच्या गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यावर तो धक्का सहन न झाल्याने त्याची आई सौ. हेमा ऊर्फ हेमलता रवींद्र पवार (वय 45) यांनीही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बिचुकले येथील रवींद्र कुंडलिक पवार (वय 64) हे आपली पत्नी हेमा ऊर्फ हेमलता, मुलगी प्रतीक्षा, मुलगा प्रतीक व शुभम यांच्या समवेत राहतात. ते शेती करतात.उत्पन्नाचे अधिकचे साधन म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यांचा लहान मुलगा शुभम हा इयत्ता दहावीत देऊर येथील मुधाईदेवी विद्यालयात शिकत आहे. तो दिवाळीच्या सुट्टीत नांदवळ (ता. कोरेगाव) येथील आत्या शालन हणमंत भोसले यांच्याकडे गेला होता. शुक्रवारी सायंकाळी त्याला वडील रवींद्र व भाऊ प्रतीक हे दोघे घरी घेऊन आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम घरात नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी वडील रवींद्र गेले. त्यांनी जवळपास शोध घेतला; परंतु शुभम सापडला नाही, म्हणून ते जनावरांच्या गोठ्याकडे गेले. त्यावेळी गोठ्याच्या बाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाला शुभम नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यावर रवींद्र पवार यांनी मोठमोठ्याने हाका मारून शेजारी राहत असलेल्या रमेश आनंदराव पवार यांना बोलावले. त्यानंतर गळफास घेतलेली दोरी सोडून शुभमला खासगी वाहनातून सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेने पवार कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे. वडील रवींद्र पवार यांनी घटनेची फिर्याद दिली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.
बसला मानसिक धक्का
शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याची आई हेमलता यांना समजल्यावर त्यांना जबर मानसिक धक्का बसला.त्यातच त्यांनीही राहत्या घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. शुभमला दवाखान्यात घेऊन गेलेल्या रवींद्र पवार यांना या घटनेची माहिती बिचुकले गावचे पोलिसपाटील सचिन कदम यांनी मोबाईलवरून दिली. त्यांना या घटनेचा धक्का बसला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |