कराड : वेदिका सेल्स कार्पोरेशनच्या लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर नंबर बनवून कारखान्यातून साखर भरलेली गाडीने पाठवून दिलेल्या सुमारे वीस लाख रूपये किमतीच्या 60 टन वजनाच्या साखरेचा परस्पर अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. राजीव नेताजी मोरे (रा. सांगली) असे संशयीताचे गुन्हा नाव आहे. याप्रकरणी जवानमल जैन यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवानमल जैन हे नवकार ट्रेडर्सच्या नावाने साखर खरेदी विक्रीचा घाऊक व्यवसाय करतात. त्यासाठी राजीव मोरे हा वेदिका सेल्स कार्पोरेशनच्या माध्यमातून दलाल म्हणून काम पाहत होता. जैन यांनी साखर कारखान्याच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर अनामत रक्कम भरल्यानंतर साखर खरेदी केली जात होती. जैन हे साखर खरेदीपूर्वी राजीव मोरे यास संदेश पाठवून गाडी क्रमाक पाठवून देत होते. त्याप्रमाणे तो ती गाडी भरून पाठवून देत होता. दि. 4 मे व दि. 8 मे रोजी राजीव मोरे याने जैन यांच्या नावे कृष्णा साखर कारखान्यातून कोणताही मेसेज दिला नसतानाही वेदीका सेल्स कार्पोरेशन यांचे लेटर पॅडवर परस्पर डिलीवरी ऑर्डर डी. ओ. नंबर 114, 139 बनवून कारखान्यातून साखर भरलेली गाडी क्रमांक (एम. एच. 10 सी. आर. 7512) या गाडीने त्यांनी पाठवून दिलेला माल जैन यांना मिळाला नसल्याने त्यांनी दि. १४ रोजी कारखान्यातून खात्याचा तपशील घेतलेवर समजून आले तसेच त्याबाबत जैन यांनी गाडी नंबर कळविला नसतानाही मोरे याने परस्पर तो माल उचलला होता. त्या मालाचे ई वे बिल प्राप्त झाले नाही. ही बाब मोरे यास फोनवरून माहिती दिली. त्यावेळी मोरे याने सांगितले की कारखान्यातील रजिस्टर व नोंदीत काहीतरी गोंधळ आहे असे सांगितले. त्यावर जैन यांनी त्या खात्याचा तपशील आणला असता त्यावर (एम. एच. 10 सी आर 7512) पाठवून माल घेऊन गेला आहात असे सांगितले. त्यानंतर दि. 15 पासून जैन यांनी माल अथवा पैसे कारखान्यात किंवा जैन यांच्याकडे जमा करण्यासाठी तगादा लावलेवर मोरे याने तुमच्या 60 टन मालाचे 19 लाख 56 हजार 150 रूपये आरटीजीएसने तुमच्या खात्यावर जमा करतो असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्याने जवानमल जैन यांनी कराड तालुका पोलिसात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली असून याप्रकरणी राजीव मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |