11:35pm | Oct 09, 2019 |
कराड : काल मंगळवारी (दि. 8) अगदी सकाळी-सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या कराडकर नागरिकांंच्या भेटीला माजी मुुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आल्यामुळे सवर्चजण अचंबित झाले.
सकाळी सात वाजता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रितिसंगम बागेत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. व त्यांच्याशी अनेकविध विषयांवर चर्चा केली. हे करत असताना नागरिकांनी आ. चव्हाण यांना चहाचा पाहुणचारही दिला. त्यांनी अगदी हातगाड्यावर उभे राहून चहा-नाष्ठा स्वतः घेतला. व नागरिकांशी सवांद करत त्यांनी पाहुणचार पुर्ण केला.
आ.चव्हाण यांनी कालची सकाळ कराडकरांच्या आठवणीत राहील अशी गाजवली. सुरुवातीस आ. चव्हाण तेथे आल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या व हास्यक्लबच्या लोकांशी संवाद साधला.
अचानक पृथ्वीराजबाबा तेथे आल्यामुळे सुरुवातीला मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना आश्चर्य वाटले. पण त्यानंतर ते सर्वांशी संवाद साधतायत हे बघितल्यावर हळूहळू कराडमधील नागरिक त्यांच्याशी स्वतःहून येऊन भेटू लागले.
या सर्वांशी बाबा संवाद साधत होते. व त्याचवेळी नागरिक त्यांच्याबरोबर आपआपले सेल्फी फोटो काढून घेत होते. मॉर्निंग वॉकर्स, हास्यक्लबचे सदस्य तसेच नदीला पोहायला येणार्यांशी ते दिलखुलास संवाद साधत होते. यामध्ये जेष्ठ, तरुण, महिला आदींचा सहभाग होता. यावेळी नागरिकांनी आ. चव्हाण यांनी कराड व मतदारसंघात केलेल्या विकासकामांना उजाळा दिला. एकजण वयोवृद्ध म्हणाले, बाबा तुम्ही प्रीतिसंगम बागेच्या विकासासाठी निधी दिल्यामुळे अतिशय सुंदर परिसर बनला आहे. त्यामुळे आम्हाला उत्तम आरोग्य कमविण्यासाठी याचा फायदा झाला आहे, असे सांगितले.
यावेळी नागरिकांनी बाबांना चहाचा पाहुणचार दिला. तो घेत आ. चव्हाण यांनी अनेकविध चर्चा केल्या. काल सकाळी अचानक पृथ्वीराजबाबा कराडकर नागरिकांच्या भेटीला आल्यामुळे दिवसभर याची कराड व परिसरात चर्चा सुरु होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |