कराड : बेकायदा पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या युवकाला पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल सहाशे रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात उंब्रज येथील दोन युवकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत संजय थोरात (वय 26 वर्षे रा. पाटील गल्ली, उंब्रज, ता. कराड) सोमनाथ पाटोळे (काशिद गल्ली, उंब्रज, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना त्यांच्या खबऱ्याद्वारे उंब्रज येथील प्रशांत संजय थोरात हा युवक तासवडे टोलनाक्यावर हॉटेल चुलांगणजवळ बेकायदा पिस्तूल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस उपाधीक्षक ढवळे यांनी गुरूवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक शेलार यांच्या नेतृत्वाखाली हवलदार सागर बर्गे, पवार, पाटील, कांबळे, कोळी यांचे पथक तयार करून बेकायदा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या युवकाला सापळ पकडण्यासाठी तासवडे टोल नाक्याकडे पाठविले. दुपारी बारा वाजल्यापासून सावज पकडण्यासाठी सापळा रचून पोलीस पथक होटेल चुलांगण परिसरात सज्ज झाले होते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पायी चालत हॉटेल चुलांगणच्या दिशेने येत असल्याचे पोलिस पथकाला दिसले. त्याच्या संशयित हालचाली अचूक टिपत पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या बाजूच्या खिशात एक पिस्तूल पोलिसांना मिळून आले.
या पिस्तूलमध्ये दोन जिवंत काडतुसे होती. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने प्रशांत संजय थोरात असे नाव सांगितले. पिस्तूलबाबत विचारणा केल्यावर हे पिस्तूल व काडतुसे काशीद गल्लीतील सोमनाथ पाटोळे याने माझ्याकडे विक्री करण्यासाठी दिली होती. या बदल्यात तो मला पाच हजार रुपये देणार होता. मला पैशाची गरज असल्याने ते पिस्तूल विक्रीसाठी तासवडे टोलनाका परिसरात आलो होतो. आपल्याकडे पिस्तूल बाळगल्याचा परवाना नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी हवालदार सागर बर्गे यांच्या फिर्यादीवरून तळबीड पोलीस ठाण्यात पिस्तूल बाळगणारा प्रशांत थोरात व त्याला पिस्तूल पुरवणारा सोमनाथ पाटोळे या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |