12:52am | Apr 27, 2019 |
सातारा : मार्च संपला, एप्रिल महिना संपत आला तरी सातारा जिल्ह्यातील शिक्षकांना अद्यापही पगार मिळाले नाहीत. प्राथमिक शिक्षण अधिकारी कोळेकरांच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांवर आज पगारापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. दरम्यान शिक्षण अधिकारी कोळेकर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांची भेट न झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि शिक्षण सभापती राजेश पवार यांनी तातडीने लक्ष घालून शिक्षकांच्या पगाराचा प्रश सोडवावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, सातारा जिल्ह्यात सुमारे साडेआठ हजार शिक्षकांचे मार्च पासून पगार थकले आहेत. एप्रिल महिना संपत आला तरी पगाराकडे दुर्लक्ष करत आहेत. कोळेकर यांच्या हेकेखोर पणामुळे पगार लांबणीवर पडले आहेत.
कामावर लक्ष नसत अशा तक्रारी वाढल्या आहेत. तरी त्याच्या वर कारवाई होत नाही. सातारा जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष काका पाटील यानी कर्मचाऱ्यांना त्रास देणे, फायली लपवून ठेवणे, जादा वेळ बसवून ठेवणे यावरून प्राथमिक शिक्षण अधिकारी कोळेकर यांना धारेवर धरून जाब विचारला होता. तरीही या शिक्षण अधिकारी यांच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही. तसेच शिक्षण सभापती राजेश पवार हे सुध्दा शिक्षण अधिकारी यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना करत नाहीत, त्यामुळे शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान शिक्षक हा मुलांना शिकवण्याचे काम करत असतो. हे करत असताना शाळा बाह्य कामे शिक्षकांकडून करून घेतली जातात. पण त्याचा योग्य प्रकारे मोबदला दिला जात नाही. निवडणूकिला जवळपास सर्व शिक्षक कामाला लावले होते. पण निवडणुकातील कामांचे भत्ते देताना दुजाभाव केला जात आहे. निवडणूक भत्ता कमी का? दिला जातो. अशी विचारणा शिक्षकांनी केली तर आचारसंहितेची भीती दाखवली जाते. आयोगाच्या कारवाईमुळे नसत झेंगट माग नको म्हणून काहीच बोलत नाहीत. सर्व कर्मचाऱ्यांसह, शिक्षकांना तोड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे अशी स्थिती होऊन बसली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |