01:52am | Sep 07, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या हद्दीमध्ये असणार्या जरंडेश्वर शुगर मिल शेजारी असणारी आणि जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या आदेशाने कराड जनता सहकारी बँकेचे जप्त केलेली लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या ताब्यात असलेल्या डिस्टलरीवरील जप्तीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने स्टे आदेश उठवल्याने कराड जनता सहकारी बँकेच्या अधिकार्यांनी चेअरमन राजेश पाटील-वाठारकर यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र डिस्टलरीच्या कामगारांनी जरंडेश्वर सहकारी कारखान्याच्या कामगारांनी विरोध केल्याने आणि लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या अधिकार्याने बँकेच्या स्टे ऑर्डरला जिल्हा सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात जाण्यासाठी दोन आठवड्याचा तात्पुरता स्टे दिल्याने प्रचंड वादावादीमध्ये डिस्टलरीवरील ताबा मिळविण्याची कारवाई थांबवावी लागली. राजेश वाठारकरांना त्यांच्या बँक अधिकार्यांसहित रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. डिस्टलरी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाने कामगार आणि बँकेचे अधिकारी यांच्यामध्ये धक्काबुक्की होवून परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची असणारी आणि 14 वर्षाच्या भाडेतत्व कराराने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या डिस्टलरीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोरेगावच्या प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांनी कराड जनता सहकारी बँकेच्या 21 कोटीच्या ऊस वाहतूकदार शेतकर्यांच्या सन 2003 च्या थकीत कर्जापोटी 28 डिसेंबर 2017 रोजी जप्ती आदेश बजावला आणि लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीची डिस्टलरी राजेश बापू वाठारकर यांच्या कराड जनता बँकेस दिली. डिस्टलरीचा ताबा शासनाच्या आदेशाने कराड जनता बँकेस मिळाला.
कराड जनता सहकारी बँकेचे डिस्टलरी चालवणार्या लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला डिस्टलरी सोडविण्यासाठी 28 जानेवारी 2018 पर्यंत एक महिन्याची मुदत दिली. त्याचा फायदा घेवून लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे अधिकारी न्यायालयात गेले. आणि जिल्हा सत्र न्यायालयातून शासनाच्या आणि बँकेच्या जप्ती कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळवली.
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने मिळवलेली तात्पुरती स्थगिती सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी उठवली. त्यामुळे कराड जनता सहकारी बँक आक्रमक झाली. त्यांनी चेअरमन राजेश बापू वाठारकर यांच्या समवेत बँकेच्या अधिकार्यांना कोरेगाव येथे पाठवून डिस्टलरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी साखर कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील 158 ऊस वाहतूकदार शेतकर्यांच्या नावे 4 कोटीचे कर्ज सन 2003 साली काढले होते. त्या कर्जाची आजची व्याजासकट रक्कम 21 कोटी इतकी आहे. ती सर्व रक्कम वसुल करण्यासाठी आणि डिस्टलरीचा पुन्हा ताबा घेण्यासाठी 60 जणांच्या, बँक अधिकारी, बँक कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या समवेत राजेशबापू वाठारकर डिस्टलरी स्थळावर दाखल झाले. त्यांनी डिस्टलरीमधील कामगार बळाचा वापर करीत बाहेर काढले. डिस्टलरीचे ऑफीस ताब्यात घेवून डिस्टलरीच्याच्या अधिकार्यांना, कर्मचार्यांना जबरदस्तीने बाहेर काढले आणि डिस्टलरीला टाळे ठोकले. नंतर डिस्टलरीचा वर्कशॉपमध्ये जावून तेथील सर्व कामगारांना हुसकावून बाहेर काढले. डिस्टलरीचे गेट पाडले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. कराड जनता बँकेचे अधिकारी आणि डिस्टलरीचे कामगार यांच्यात धक्काबुक्की झाली.
या संघर्षात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कामगारांनी उडी घेतली. त्यांनी 10 वर्षापूर्वी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी शालिनीताई पाटील यांनी कामगारांच्या नावे विविध बँकाच्याकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीची लेखी हमी बँकेचे चेअरमन आणि कराड बँकेच्या वसुली अधिकर्यांनी द्यावी असा आग्रह धरला आणि डिस्टलरीच्या समोर दंगा केला. त्यामुळे लेखी हमीची विनंती मान्य करुन कराड जनता सहकारी बँकेच्या अधिकार्यांनी जेसीबीच्या सहाय्याने डिस्टलरीच्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |