12:54am | Mar 17, 2019 |
सातारा : शेणोली, ता. कराड येथील महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 17 लाख 10 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासात नागपूर क्राईम ब्रांच व मुंबई पोलिसांनी मदत केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. 11 मार्च रोजी शेणोली येथील महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या दरोड्याच्या तपासाबाबत अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एलसीबी टीमला तपासाच्या सूचना दिल्या होत्या घटना घडल्यानंतर कराड पोलिस व एलसीबीच्या टीमने तात्काळ हालचाली केल्या. मात्र, चोरटयांनी कोणताही पुरावा न सोडल्याने तपासाचे पोलिसांसमोर तपासाचे आवाहन होते. या तपासासाठी खबर्यांना मागावर लावले होते. यामधील एका खबर्याने रेकॉर्डवरील एका गुन्हेगााचा समावेश असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. यामधील दोन पथकांनी सोलापूर जिल्ह्यात तपास करत असताना पारे, ता. सांगोला येथे छापा टाकून किरण शिवाजी गायकवाड (वय 24, रा. कडेगाव, जि. सांगली) व दत्तात्रय मधूकर जाधव (वय 24, रा. पारे, ता. सांगोला) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेली 7 लाख 84 हजाराची रोकड, 2 लाख 3 हजार रूपये किंमतीच्या काडतुसासह पिस्टल जप्त केल्या. यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता या घटनेतील आणखी दोन संशयित हे सोलापूर येथील खुराना ट्रॅव्हल्सच्या बसमधून नागपूर येथे पळून जात असल्याची माहिती मिळाली. ही खबर एलसबीच्या टीमने अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी नागपूर क्राईम ब्रांचच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबातबची माहिती दिली. त्यानुसार संबधित बस नागपूरमध्ये आल्यानंतर नागपूर पोलिसांनी श्रवणकुमार ब्रीजनंदन प्रसाद यादव (वय 24) व अभिषेक कुमार रणजितसिंग (वय 20) दोघेही रा. दानापूर, जि. पटणा, बिहार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 लाख 31 हजार 200 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.
तर दरोड्यातील पाचवा संशयित विकीराज संजय चौधरी (वय 22, रा. बेली रोड, पटणा सध रा. चेंबूर) हा मुंबईत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. हा संशयित पळून जायच्या आत त्याला ताब्यात घेण्यासाठी याबाबत चेंबूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिंसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मॅग्झीन व एक जिवंत काडतुस जप्त केले. या तपासात एकूण 14 लाख 4 हजार 300 रूपयांची रोकड, 90 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 3 हजार 800 रूपयांची 19 जिवंत काडतुसे, 12 हजार 200 रूपयांची तीन मॅग्झीन व 1 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |