06:48pm | May 05, 2018 |
सातारा : पोलीस दलात पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाने गौरव होणे हे खूप मानाचे समजले जाते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी 2017-18 या वर्षासाठी सातारा जिल्ह्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचार्यांना हे सन्मानचिन्ह बहाल केले. हे सन्मानचिन्ह पोलीस दलातील उत्कष्ट व निष्कलंक सेवेबद्दल प्रदान करण्यात येते. यावर्षी हे सन्मानचिन्ह सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर व पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांना तसेच अन्य 15 पोलीस कर्मचार्यांना सातार्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते 1 मे रोजी गौरव सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव हे मुळचे वाई तालुक्यातील बोपेगावचे रहिवासी असून ते 1983 साली पोलीस शिपाई पदावर पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी आतापर्यंत उंब्रज, सातारा शहर, वाठार, सातारा ग्रामीण, सातारा स्थानिक गुन्हे शाखा, पाचगणी आदी पोलीस ठाण्यात उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. 2013 साली झालेल्या पोलीस उपनिरीक्षक या अर्हता परिक्षेत आपले अभ्यासू कौशल्य दाखविल्यानंतर राजेंद्र यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर वाई, कोरेगाव, सातारा येथे पोलीस सेवा बजावलेली आहे.
त्यांच्या 36 वर्षाच्या अनुभवपूर्ण कारकीर्दीत त्यांनी 2007 साली नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून सातारा जिल्हा पोलीस दलात मानाचा तुरा खोवला. त्यानंतर त्यांनी मानवी हक्क आयोगामार्फत घेतल्या जाणार्या विभागीय वर्क्तृत्व स्पर्धेत सलग तीन वेळा पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले आहे. याचबरोबर 2008 व 2009 साली झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात हिरीरीने सहभागी होवून सायंटिफिक एडस टू इन्व्हिस्टिगेशन या विषयात अनुक्रमे सुवर्ण व ब्रॉंझ पदक मिळविले आहे. राजेंद्र यादव यांच्या संपूर्ण पोलीस सेवा कालावधीत त्यांनी 5 खून, 4 घरफोड्या, 5 दरोडे, 6 जबरी चोर्या, 2 खुनाचे प्रयत्न, असंख्य चोर्या असे उघडकीस न आलेले व अत्यंत गुंतागुंतीचे गुन्हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व परिपूर्ण बुद्धि कौशल्याचा वापर करुन तसेच प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर उघडकीस आणले आहेत. याशिवाय 11 फरारी आरोपी, 7 पाहिजे असलेले खतरनाक आरोपी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या मदतीने पकडले आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांचा प्रलंबित कामांचा निपटारा, जनतेशी असलेली अत्यंत सौहार्दपूर्ण व चांगली वर्तणूक, नवनवीन आव्हाने स्विकारण्याची आवड, पोलीस सेवेत नियमितता, उत्कृष्ट वर्क्तृत्वशैली याद्वारे समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या सर्व चांगल्या कामगिरीबाबत तसेच तब्बल 225 हून अधिक बक्षिसांचा विचार करता त्यांना पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह प्रदान करुन राजेंद्र यादव यांच्या कामगिरीचा तसेच प्रदीर्घ सेवेचा उचित गौरव झाला आहे.
पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांचा सातारचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (गृह) राजलक्ष्मी शिवणकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, कोरेगावच्या उप विभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, पाटणच्या उप विभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी, अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |