02:21am | Oct 31, 2018 |
सातारा : सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी फोफावली असून अनेक सुशिक्षीत वर्ग तुटपूंज्या वेतनावर बारा बारा तास काम करीत आहेत. परंतु महिला अर्थिक विकास महामंडळाने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी पद निर्माण केले व थेट राष्ट्रीय अजिवीका मिशन कार्यक्रम अंतर्गत रिझनल रिसॉर्स पर्सन पदावर नियुक्ती केली. परंतु महामंडळाकडून काम न करता किमान पाच अधिकार्यांना वेतन अदा केल्याने खळबळ माजली आहे. महिलांऐवजी मर्जीतील अधिकार्यांचा आर्थिक विकास पुणे विभागात झाला असून सध्या सदर अधिकारी मराठवाडा विभागात कार्यरत असल्याची माहितीला दुजोरा मिळाला आहे. अधिकार्यांनी घेतलेले सदर वेतन सहव्याज परत करावे या मागणीसाठी आता आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप यांनी दिला आहे.
महाराष्ट्र महिला अर्थिक विकास महामंडळाच्या पुणे विभागात रिझनल रिसॉर्स पर्सन पदावर नियुक्ती केली. त्याप्रमाणे या पदावर काम करणार्या अधिकार्याला 37 हजार 623 दरमहा असे मिळून अकरा महिन्याच्या करारानुसार वेतन अदा केले. या नेमणुकीसाठी कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली नाही. अर्ज मागवले नाहीत. तसेच इच्छुक उमेदवारांच्याकडे किंवा स्वयंरोजगार केंंद्राकडे मागणीही केली नाही. असे असताना महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक यांनी पदाचा गैरवापर करून श्री. सिध्दराम माशाळे यांना एकाच पदावरून दुसर्या पदावर नियुक्ती केली. विषेश म्हणजे करारनामा संपुष्टात आल्यानंत 4 एप्रिल 2018 रोजी पुन्हा त्यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना 5 एप्रिल 2018 ला कार्यालयीन आदेशानुसार एका दिवसाच्या विनंती अर्जानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांना रूजू व्हावे असा कार्यालयीन आदेश दि. 5 एप्रिल 2018 रोजी पत्र क्रमांकनुसार माविम/प्रशासन/का.आ./2018/26 आदेश काढण्यात आला. या आदेशावर व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो यांची स्वाक्षरी आहे.
सध्या व्यवस्थापक संचालक बदलला असल्याने ही बाब उघडकीस आणली गेली आहे. या प्रकरणामुळे महिला अर्थिक विकास महामंडळात महिलांचा अर्थिक विकास होतो की, मर्जितील अधिकारी आपल्या जवळच्या अर्थिक विकास करतात? याचे आता कोेडे पडले आहे. ग्रामीण भागात लघु व्यवसायासाठी महिला बचत गटांना खुप मेहनत घ्यावी लागते. त्यांना महिला अर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली जात नाही. अशावेळी रिझनल रिसॉर्सचे काम काय? असा सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. याबाबत महिला अर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करून खर्या गरजू महिला वर्गाला लघु उद्योगासाठी अर्थ सहाय्य केले तरच हे महामंडळ महिलांसाठी आदर्श ठरेल अशा शब्दात महिला उद्योजीका अमृता माने यांच्यासह अनेक महिला उद्योजकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |