02:26am | Feb 22, 2019 |
सातारा : सर्जापूर गावात आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून असंख्य विकासकामे मार्गी लागली आहेत. निवडणूक जवळ आली की भुछत्राप्रमाणे उगवणार्या दिपक पवारांनी आजपर्यंत 1 रुपायाचेही काम सर्जापूरमध्ये केलेले नाही. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळेच कुडाळ ते सर्जापूर या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली असून या कामाशी आमदारकीचे स्वप्न पाहणार्या मुंगेरीलालचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे पवारांनी केलेल्या बॅनरबाजीने काहीही ङ्गरक पडत नाही, असा टोला सर्जापूर ग्रामस्थांनी लगावला आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जावली तालुक्यातील कुडाळ ते सर्जापूर आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते रायगाव या दोन रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध होण्यासाठी 9 जून 2018 रोजी कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सातारा यांना लेखी पत्र दिले होते. यानंतर आ. शिवेंद्रसिंहाजे यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर करण्यात आला. कुडाळ ते सर्जापूर (3.10 किमी) या रस्त्यासाठी 3 कोटी 56 लाख 79 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांमधून प्रसिध्द होताच दीपक पवार यांनी सर्जापूर येथे ङ्गलक लावून या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमधून निषेध व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल सर्जापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा गणेश मोहिते, देविदास बोराटे, विनायक मोहिते, प्रविण मोहिते, प्रसाद बोराटे आदी ग्रामस्थांनी सत्कार करुन आभार मानले. यावेळी बोलताना या ग्रामस्थांनी दीपक पवार यांनी आजअखेर 1 रुपायाचे काम सर्जापूरमध्ये केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच निवडणूक आली की पवार यांना ग्रामस्थांचा पुळका येतो. मंदीर बांधून देतो. ग्रामपंचायत कार्यालय, गावातला रस्ता करतो. जीमचे साहित्य देतो असे सांगून गेल्या पाच वर्षांपासून पवार यांनी ग्रामस्थांना भुलवण्याचे काम केले पण, एकही काम केले नाही. याउलट आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पवारांनी न केलेल्या कामाचे श्रेट लाटून आणि बॅनरबाजी करुन ग्रामस्थांवर काहीही परिणाम होणार नाही. उलट या मुंगेरीलालचे आमदारकीचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
पालकमंत्र्यांना विचारुन पोस्टरबाजी करा...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मिळवण्यासाठी त्या मतदारसंघाच्या आमदारांचे पत्र लागते. या योजनेतून कोणते काम घ्यायचे याचे अधिकार ङ्गक्त आमदारांना आहेत, हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार यांनी नुसती लुडबुड करण्यात वेळ घावलून बॅनरसाठी पैसे वाया घालवू नयेत. किमान पालकमंत्र्यांना विचारुन तरी पोस्टरबाजी करावी, असा उपरोधीक सल्लाही ग्रामस्थांनी यावेळी पवारांना दिला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |