06:59pm | Aug 19, 2018 |
सातारा : होळ, ता. फलटण येथील उपसरपंच विनोद बबन भोसले यांनी दि. 17 रोजी सावकारांच्या तगाद्यामुळे आत्महत्त्या केली होती. त्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली होती. भोसले यांनी आत्महत्त्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यानुसार उल्लेख केलेल्या पाच अवैध खासगी सावकारांपैकी तिघांना पकडण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर दोघांचा युद्धपातळीवर शोध सुरु असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.
फलटण तालुका हा अवैध खासगी सावकारीमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात बदनाम झालेला असतानाच काल होळ, ता. फलटण येथील उपसरपंच विनोद बबन भोसले यांनी फलटणमधील सावकारांकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळामुळे गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे फलटण तालुक्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या संशयित आरोपींना जोपर्यंत अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा होळ, साखरवाडी भागातील ग्रामस्थांनी घेतला होता. फलटण ग्रामीण पोलिसांनी तात्काळ रविराज राजाराम घनवट रा. जाधववाडी फलटण, अनिल चांदुगडे रा. जिंती नाका फलटण व रविंद्र हरिभाऊ काकडे यांचा मुलगा अभिलाष रविंद्र काकडे रा. मंगळवार पेठ फलटण यांना अटक केली होती. अटकेतील आरोपींना फलटण येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील फरार असलेले आरोपी विनोद हणमंत चव्हाण रा. शेरेवाडी, ढवळ ता. फलटण तसेच बाळू मुकूंदा कोळेकर रा. कोर्हाळे खुर्द ता. बारामती हे संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली आहे. दरम्यान फलटण तालुक्यात अवैध खासगी सावकारांच्या विरोधात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले असून ज्या सावकारांच्या भीतीपोटी अनेक लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे धाडस केले नाही, अशा लोकांनी कोणतीही भीती न बाळगता फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पोलीस निरीक्षक हंकारे यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |