07:01pm | May 07, 2018 |
सातारा : फलटण तालुका आणि अवैध सावकारी असे समीकरण गेली दोन दशके फलटणकर अनुभवीत आहेत. त्यामध्ये राजकीय पुढार्यांचा ‘इंटरेस्ट’ वाढल्यामुळे फलटणमधील अवैध सावकार कोट्याधीश झाले. त्यांना पाठिशी घालून फलटणचे पुढारी गब्बर झाले. गेल्यावर्षी फलटणची अवैध सावकारी नेस्तनाबूत करण्यासाठी ‘सातारा टुडे’ने विडा उचललेला होता. अनेक सावकार पीडितांनी ‘सातारा टुडे’कडे धाव घेवून आपली कैफियत मांडली. यावेळी सातारा टुडे ने निर्भिडपणे, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अवैध सावकारांवर आसुड ओढण्याचे काम केले होते. सातारा टुडे च्या वृत्तांची दखल घेवून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का चे अस्त्र परजून फलटणच्या पुढार्यांच्या बगलबच्च्यांच्या नांग्या ठेचल्या होत्या. परंतू सरतेशेवटी फलटणच्या पुढार्यांना उपरती आली असून आपल्या बगलबच्च्यांचे पाप लपविण्यासाठी फलटणमध्ये फलटण नरेशांच्या नावाने 'सेटलमेंटचे' दुकान उघडल्यामुळे फलटणकर मात्र कोमात गेले आहेत.
अवैध सावकारी, गुन्हेगारी, मटका, जुगार अशा अवैध व्यवसायांमध्ये फलटण तालुका सातारा जिल्ह्यात अव्वल आहे. माजी आमदार चिमणराव कदम यांचा पराभव झाल्यानंतरच फलटण तालुका खर्या अर्थाने शोषिक झाला होता. महाराष्ट्राचे थोर सुपूत्र व उप पंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करुन गोरगरीबांच्या मुलांना राजकारणात आणले होते. त्यांच्यापैकीच एक म्हणजे सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम. चिमणराव कदमांच्या काळामध्ये फलटणमध्ये गुंडगिरीला थारा नव्हता. अवैध धंदे होते, तेपण जेवणात जेवढे मीठ असते, तेवढेच. मात्र माजी आमदार चिमणराव कदमांची सद्दी संपल्यानंतर फलटणमध्ये बेबंदशाही सुरु झाली. झोपड्यांमध्ये राहणारे सावकार टोलेजंग बंगले बांधून राहू लागले. शेतकर्यांच्या बागायती जमिनी सावकारांच्या घशामध्ये जाऊ लागल्या. फलटणमधील शेतकरी गेल्या काही वर्षामध्ये देशाधडीला लागलेला आहे. सावकारांच्या कमिशनपोटी फलटणमधील पुढार्यांचे राजकारण सुरु आहे. कोणी नगरसेवक, कोणी जि. प. सदस्य अशा पदांवर अवैध सावकारी करणार्यांची वर्णी लावून फलटणमधील दाढीवाल्या बाबांनी फलटणच्या राजकारणावरील मांड पक्की केली. सुमारे एक वर्षापूर्वी झिरपवाडी, ता. फलटण येथील रवींद्र ढेंबरे या व्यवसायिकाला संजय जाधव रा. सोमवार पेठ, फलटण याने व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून त्याच्यासह कुटूंबियांना जबरदस्त मारहाण केली होती. एवढा माज अवैध सावकारी करणार्या लोकांना आलेला होता. याची तक्रार देण्यासाठी ढेंबरे फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले. मात्र त्यांची तक्रार तर सोडाच, उलट त्यांनाच फलटण शहर पोलीस ठाण्यातून हाकलून देण्यात आले होते. शेवटी सातारा टुडे ने या प्रकरणात लक्ष घालून संजय जाधवच्या मुसक्या आवळण्यास फलटण शहर पोलीसांना भाग पाडले होते.
विद्यमान नगरसेवक सनी अहिवळे, धुळदेवचा माजी सरपंच व्यंकट दडस, सस्तेवाडीचा विनायक चव्हाण, संजय जाधव फलटणमधील अशा अनेक सावकारांवर केवळ सातारा टुडे च्या दट्ट्यामुळे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे फलटणमधील शेंबडे पोरगेही सांगू शकेल, एवढे हे ढळढळीत सत्य आहे. सध्या फलटण तालुक्यात अवैध सावकारांवर कारवाया झाल्यामुळे नागरिक सुखाचे दोन घास खात आहेत. मात्र सरतेशेवटी फलटणच्या पुढार्यांना उपरती सुचली आहे, की 'सेटलमेंटचे' दुकान सुरु केले आहे?. समोरून तक्रारदाराला बोलवायचे व पाठीमागून अवैद्य सावकारशी 'सेटलमेंट' करायची या प्रकारामुळे फलटणकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘तूच कर्ता आणि करविता’ असतानाही फलटण नरेशांचे नाव वापरुन अवैध सावकारी निर्मूलन करणे म्हणजे ‘अंधारात केलं, पण उजेडात आलं’ अशी परिस्थिती झाली आहे. या प्रकारामुळे फलटण नरेशांसह त्यांच्या दोन्ही दाढीवाल्या बंधूंचे हसे झाले आहे.
अवैध सावकारी प्रकरणात फलटणमधील एक नगरसेवक अडकला होता. त्याच्या सुटकेसाठी कोणी-कोणी प्रयत्न केले, याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे अवैध सावकारी प्रकरणात फलटणमध्ये पुतणा मावशीचे प्रेम दाखविण्याची गरज आता फलटणकरांना उरलेली नाही. फलटण तालुक्यात अवैध सावकारी निर्मूलनाचे दुकान उघडून काही दाढीवाले बाबा सेटलमेंट करीत असल्याची चर्चा फलटण शहरात सध्या सुरु आहे. ज्यांच्यावर गेल्या दोन दिवसांत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई झाली आहे, ते कोण-कोणत्या बंगल्यावर व फार्म हाऊसवर असतात, याची सचित्र माहिती सातारा टुडे कडे आहे. येत्या काही काळामध्ये ही माहिती फलटणकरांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. बगलबच्च्यांवर अवैध सावकारी प्रकरणी कारवाया करायच्या व सेटलमेंटपोटी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता गिळंकृत करण्याचा हा फंडा दाढीवाल्या बाबांनी सध्या सुरु केला असल्याची चर्चा फलटणमध्ये सुरु आहे. त्यामुळे फलटणच्या या दाढीवाल्या बाबांच्या नादी लोकांनी लागू नये, तुमची फसगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी सातारा पोलिसांनी फलटणमधील अवैध सावकार नायनाट मिशन सुरु केल्यानंतर फलटणमधील हेच बाबा शेपट्या घालून बिळात लपले होते. आताच त्यांचे या प्रकरणात ‘मन कसे उठले?’ याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फलटणची अवैध सावकारी फक्त आणि फक्त सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या दणक्यामुळे संपलेली आहे. नगरसेवक सनी अहिवळे, खंड्या उर्फ प्रमोद धाराशिवकर, संजय जाधव यांच्यावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ‘मोक्कास्त्र’ डागून फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील अवैध सावकारी संपविलेली आहे. जे छोटे-मोठे अवैध सावकार राहिलेले आहेत, त्यांचाही नंबर आता लागलेला आहे. असे असताना फलटणच्या दाढीवाल्या बाबांकडून अवैध सावकारी प्रकरणी सुरु केलेले दुकान म्हणजे फक्त 'सेटलमेंटचा' अड्डा आहे. या सेटलमेंटच्या दुकानात जावून फलटणकरांची फसगत होवू शकते. मदार्याच्या हातात आता दोरी पण आहे, आणि डमरु पण आहे. त्यामुळे त्यांच्या तालावर नाचणारे माकड बनू नका. राजेशाही खालसा होवून उणेपुरे पाऊण शतक झालेले आहे. या राजांच्या नादाला लागून फलटणकरांनी स्वत:चे वाटोळे करून घेतले आहे. भविष्यात सन्मानाने जगावे, यासाठी फलटणकरांनी या 'सेटलमेंटचे दुकानात जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा.
माझ्याशी संपर्क साधा : पोलीस अधीक्षक संदीप पाटील
मोक्का अन्वये कारवाई करण्यात आलेल्या सातार्यातील नामचीन गुन्हेगार दत्ता जाधव याच्या मुसक्या आवळून सातारा पोलिसांनी आपले आगामी इरादे स्पष्ट केले आहेत. विनोद उर्फ बाळू खंदारे, प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर, अनिल कस्तुरे, आकाश उर्फ बाळा खुडे, दत्ता जाधव यांनी दरोडा, जबरी चोरी, खंडणी व अपहरण असे गुन्हे केले आहेत, परंतू त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणी घाबरत असतील तर नागरिकांनी कोणतीही भिडभाड न ठेवता निर्भिडपणे त्या-त्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करावेत. तसेच फलटण येथील नागरिकांनीही कोणत्याही आमिषाला बळी न पडता व कोणत्याही संपर्क कार्यालयाशी संपर्क न ठेवता थेट फलटण शहर अथवा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |