- अजित जगताप
सातारा : सध्या संचारबंदीमुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मंडई परिसरात शहरवासीय गर्दी करू लागले आहेत. मात्र, डोंगराळ भागातील ग्रामस्थांना ते शक्य नाही. ही अडचण ओळखून ग्रामसेवक गोकुळ उदागे व हरी डोंगरे यांनी स्वखर्चाने सताऱ्यातून भाजीपाला विकत आणून तो फुकट वाटप करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या रेवंडे, बेंडवाडी येथे ग्रामसेवक हरी डोंगरे तर चिखली, जांभे, चोरगेवाडी या ठिकाणी ग्रामसेवक गोकुळ उदागे कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी देशभर एकवीस दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागात आजही अशा सेवा मिळणे दुरापास्त आहे. त्याची जाणीव सर्वांना आहे. डोंगराळ भागातील ग्रामस्थ आठवड्याच्या बाजारातून वस्तू खरेदी करतात. मात्र, हे बाजार सुध्दा बंद झाले आहेत. त्यामुळे या भागातील कष्टकरी, शेतकरी, मजूर, कामगार कुटूंबातील लोकांची गैरसोय झाली होती. ही अडचण ओळखून ग्रामसेवक डोंगरे व उदागे यांनी स्वखर्चाने भाजीपाला विकत आणून तो गरजू ग्रामस्थांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला.
पहाटे पाच वाजता सातारा येथील घाऊक भाजीपाला व्यापारीकडून शेंवग्याची शेंग, कॊबी, कोथिंबीर, बटाटा, टोमॅटो, मिरची, घेवडा, वांगी असा भाजीपाला विकत घेतला व चारचाकी वाहनाने डोंगराळ भागात गावतील लोकांना एकमेकांपासून दिड मीटर अंतर रांगेत उभे करून भाजीपाला वाटून टाकला. त्यामुळे चार दिवसांचा आमटी व भाजीचा प्रश्न सुटला.
ग्रामसेवक हरी डोंगरे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत, तर ग्रामसेवक गोकुळ उदागे हे सातारा शहरनजिकच्या प्रतापसिंह नगरातील आहेत. दोघांनीही गरिबीतून कष्ट करून शिक्षण घेतले आहे.सध्या सातारा तालुक्यातील डोंगराळ भागात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विधायक उपक्रमातही सहभागी होऊन मानवता जपली आहे. त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |