12:13am | Sep 23, 2019 |
सातारा : ‘कोणत्या शहाण्याने सांगितले वयस्कर झालो. अजुनही मी काहीही करू शकतो. १८ तास, २० तास काम करेन, पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जावू देणार नाही. त्यासाठी साथ द्या, अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे घातली. भाजपमध्ये जाणारे आम्हाला मतदार संघात विकास करायचा असल्याचे कारण सांगतात. तुम्हाला १५ - १८ वर्षे काम करण्याची संधी दिली, मंत्रीपदे दिली. १५ वर्षे तुमच्या हातात सत्ता होती, तेव्हा तुम्ही काय करत होता, असा जळजळीत सवाल करत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांचा कडक शब्दात समाचार घेतला.
सातारा येथे आज आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे सातारा - जावलीतील नेते दीपक पवार यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. मेळाव्यापूर्वी पोवई नाक्यापासून भव्य रॅली काढण्यात आली.
क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यासारख्या क्रांतीकारकांनी देशातील तरूण पिढीला लढण्याची प्रेरणा दिली. हा वारसा ज्यांना दिली ते येथील तरूण चुकीच्या मार्गाला जात नाहीत. जे चुकीच्या मार्गाला गेले त्यांना ते त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दुष्काळ असो, महापूर असो आजचे राज्यकर्ते त्याकडे बघायला तयार नाहीत. एका बाजुला बेकारी आणि दुसरीकडे आहेत ते रोजगारही जात आहेत. बड्या उद्योगपतींनी बँकांची थकवलेली कर्जे भागवण्यासाठी ८५ हजार कोटी रूपये बँकात भरण्याचा निर्णय वेंâद्र सरकारने दहा दिवसांपूर्वी घेतला. आणि शेतकऱ्यांची कर्जे थकली तर तुम्ही त्यांची भांडीकुंडी बाहेर काढता, असा हल्ला पवार यांनी केंद्र सरकारवर चढवला. आज ज्यांच्या हातात राज्य आहे, त्यांना काळ्या आईशी इमान राखणाऱ्याबद्दल काहीही देणेघेणे नाही. ते संकटात असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्यांच्या हाती राज्य जावू द्यायचे नाही असा निकाल घेण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
साथ सोडणारा खासदार होत नाही विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने पोटात गोळा उठला आहे, अशी खिल्ली जयंत पाटील यांनी उदयनराजे यांचा नामोल्लेख न करता उडवली. साताऱ्यात राष्ट्रवादीची साथ सोडणारा कधी खासदार होत नाही, असे ते म्हणाले. भाजपने जो राजकीय व्यभिचार सुरू केला आहे आणि त्याला जे बळी पडत आहेत त्यांच्याकडे बघून घेण्याची इर्षा तरूणांमध्ये दिसत आहे, असे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, संजीवराजे नाईक - निंबाळकर, दीपक पवार आदिंची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्वागत केले.
... हे वागणं बरं नव्हं : उदयनराजेंवर टीकास्त्र
भाजपमध्ये गेलेल्या माजी खासदार उदयनराजे भोसले यांनाही पवार यांनी नाव न घेता शेलक्या शब्दात फटकारले. दिल्लीच्या दरबारात मान राखला गेला नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज लाथ मारून बाहेर पडले होते. आणि आज... असे सांगून पवार यांनी पॉज घेतला व ते म्हणाले, हे वागणं बरं नव्हं. तेव्हा उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली. तुम्हा आम्हाला सातारच्या गादीबद्दल अभिमान आहे. महाराष्ट्रधर्म शिकवणाऱ्या छत्रपती शिवरायांची ही गादी आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी सल्ला दिला असतानाही सातारच्या उमेदवारीचा निर्णंय घेतला होता. वेगळा मार्ग स्वीकारण्याचा त्यांना अधिकार आहे. येथील तरूण अशा निर्णयामुळे पेटून उठला आहे, असे ते म्हणाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |