02:57am | Apr 21, 2019 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन योजनांना आवश्यक तो निधी केंद्र व राज्य सरकारने दिला आहे. याशिवाय जलयुक्तची कामे केली आहेत. खासदार उदयनराजे भोसले जी कामे आपण केली म्हणून सांगत आहेत, त्यापैकी एकतरी काम आघाडी सरकारच्या काळात झाले का? त्यांनी एक पैसाही दिला नाही. मोदी सरकारने आणलेला हा बदल आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी साताऱ्यातून नरेंद्र पाटील या संघर्षशील नेत्यास निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे केले.
महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ येथील गांधी मैदानावर ‘विजय संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, सदाभाऊ सपकाळ, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, पुरूषोत्तम जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, दीपक पवार, मनोज घोरपडे, महेश शिंदे आदीमान्यवर उपस्थित होते.
विरोधक मोदी विरोधाने पछाडले असल्याचा घणाघात करत फडणवीस यांनी काँग्रेस - महाआघाडीवर तुफान हल्ला चढवला. विरोधक झोपेतून दचकून उठतात व मोदी मोदी करतात. मोगलांना ज्याप्रमाणे संताजी - धनाजी दिसायचे, त्याप्रमाणे, त्यांना सगळीकडे मोदीच दिसतात, असा टोला त्यांनी लगावला. आधीच्या ५० - ६० वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीत देशात अनाचार, दुराचार व भ्रष्टाचार याचाच बोलबाला होता. मुठभर लोक श्रीमंत झाले. पण शेवटचा माणूस गरीब राहिला. पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम केले. देशाची मान उंचावेल असा कारभार त्यांनी केला. त्यामुळे लोकांना मोदी सरकारच हवे आहे. ही फक्त विकासाची निवडणूक नाही, तर राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, एकसंघ देश कोण उभा करू शकतो हे ठरवण्याची व त्याचा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे. त्यासाठी नरेंद्र पाटील यांचे धनुष्यबाणाचे बटणच दाबावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
साखर कारखानदारीसंदर्भात पाच वर्षात मोदी सरकारने जेवढे निर्णय घेतले, तेवढे दहा वर्षात जाणते राजे घेऊ शकले का? असा सवाल करत त्यांना शरद पवार यांना लक्ष्य केले. पवार साहेब पायाला पॅड बांधून माढ्याच्या मैदानात उतरले, पण हवेचा अंदाज आल्यावर न फलंदाजी करता बारावा गडी म्हणून राहीन असे त्यांनी सांगितले. काय वेळ आली पहा अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. जाहीरनाम्यात राष्ट्रवादी म्हणते, पाकशी चर्चा करू. पण महाराज, तुम्ही जरा पवार साहेबांना सांगा, हा छत्रपतींचा देश आहे. काँग्रेस आघाडीची आश्वासने हा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. उद्या हे सांगतील गरीबांना ताजमहाल बांधून देवू. काही दिवसांनी यांच्या भाषणापूर्वी सूचना येईल, की हे पूर्ण काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. यांच्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर आपल्या जबाबदारीवर विश्वास ठेवा. पुन्हा आम्ही जबाबदार नाही, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवरही निशाना साधला.
उदयनराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच जिल्ह्यात बदल हवा असे लोकांना वाटायला लागले आहे. आता कुणाला घाबरायचे कारण नाही. सगळे मिळून परिवर्तन करणार आणि उदयनराजे यांना पाडणार म्हणजे पाडणारच असा निर्धार नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आपण उदयनराजे यांना २३ प्रश्न विचारले होते. मात्र चार दिवस झाले तरी त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार मदन भोसले, अशोक गायकवाड यांचीही भाषणे झाली. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |