02:26am | Nov 06, 2018 |
सातारा : जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला असताना घरात घुसून पुन्हा पैशाची मागणी करत तसेच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधातील गुन्हा मागे घे, असे म्हणून मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, माजी आमदाराचे तक्रारीत नाव आल्याने खळबळ उडाली आहे.
जितेंद्र जगन्नाथ जाधव (रा.कल्याणी शाळेजवळ, गोडोली) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी खुशबू अतुल शहा (वय 27, रा. प्रिया डुप्लेक्स, नवी एमआयडीसी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित जितेंद्र जाधव हा तक्रारदार यांच्या घरात गेला. संशयित व तक्रारदार यांचा जमिनीचा व्यवहार झालेला आहे. त्या व्यवहारात काही देणे घेणे नसतानाही तक्रारदार याने जमिनीच्या व्यवहारातील सुमारे 50 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी संशयिताने शिवीगाळ करुन कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केली.
मारहाण करत असताना संशयिताने शहा कुटुंबियांना माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दमदाटी केली. तसेच पैसे न दिल्यास कुटुंबातील व्यक्ती उचलून नेण्याची धमकी दिली. संशयिताने घरात घुसून हा सर्व प्रकार केल्याने तक्रारदार यांचे शहा कुटुंबिय भितीच्या छायेखाली गेले. याप्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |